केमिकलचा टँकर पलटी; सूर्या नदीचे पाणी प्रदूषित - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, November 10, 2019

केमिकलचा टँकर पलटी; सूर्या नदीचे पाणी प्रदूषित

https://ift.tt/2Q57mnw
मटा वृत्तसेवा, मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गवरील पालघर तालुक्यातील मेंढवण येथील कौटुंबी नदीत शनिवार दि. ९ नोव्हेंबरला केमिकलचा टँकर पलटी झाला होता. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र टँकर मधील केमिकल नदीत सांडले गेल्याने संपूर्ण नदीचे पाणी प्रदूषित झाली आहे. संपूर्ण नदीत हे केमिकल पसरले असून फेसाचे मोठे झब्बे तयार झालेले दिसतात. सूर्या नदीतून पालघर, टेभोडे, वेऊर, नवली, आल्याळी, घोलवीरा, लोकमान्य नगर, डुंगी पाडा, गोठणपूर, या पालघर नगर परिषद क्षेत्रातील भागात पाणीपुरवठा केला जातो. बोईसर औद्योगिक वसाहत व परिसरातील २५ गावांमध्ये आणि वसई -विरार-नालासोपारा महानगरपालिका क्षेत्रातील भागात हे पाणी पिण्यासाठी पाईपलाईनद्वारे पुरविले जाते. पाणी पुरवठा विभाग तसेच एमआयडीसी, व जिल्हा परिषद, आणि जिल्हा महसूल विभागाने देखील गेल्या दोन दिवसात या बाबत कोणतीही दखल घेतल्याने शनिवारपासून या सर्व परसरातील नागरिकांना हेच पुरवठा होत असल्याने त्याचे मानवी शरीरावर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.