मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार; उद्धव ठाकरे मागणीवर ठाम - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, November 1, 2019

मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार; उद्धव ठाकरे मागणीवर ठाम

https://ift.tt/2C37n3i
मुंबई: मुख्यमंत्रिपदासह सत्तेचे समसमान वाटप झालेच पाहिजे, असे ठासून सांगताना, ज्या अर्थी शिवसेना पक्षप्रमुख यांनी मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार असे म्हटले आहे, त्या अर्थी मी आपल्याला लिहून देतो की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, असे ठाम मत शिवसेनेचे प्रवक्ता, खासदार यांनी व्यक्त केले आहे. शिवसेनेने ठरवलं तर आपलं सरकार बनवू शकते असे म्हणत राऊत यांनी भारतीय जनता पक्षाला स्पष्ट इशारा दिला आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राऊत शिवसेनेची भूमिका मांडत होते. शिवसेनेच्या या भूमिकेमुळे राज्यातील सत्तास्थापनेचा पेच कायम असून शिवसेना समान सत्तावाटपाच्या आपल्या मागणीवर ठाम असल्याचे स्पष्ट होत आहे. राज्यातील सरकार महायुतीचे होणार असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले असल्याने सध्या आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत असे सांगत भाजप समान सत्तावाटपाचे सूत्र मान्य करते किंवा नाही याचीच शिवसेना वाट बघत असल्याचे राऊत यांनी अप्रत्यक्षपणे म्हटले आहे. राज्यात भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष असून राज्यघटनेनुसार सत्ता स्थापनेचा त्यांना अधिकार आहे. त्या मुळे भाजपने सत्ता स्थापनेचा दावा करावा आणि बहुमत सिद्ध करावे असेही राऊत म्हणाले. लोकसभा निवडणुकीआधी जी चर्चा दोन पक्षांदरम्यान झाली, त्याला अनुसरूनच सत्तास्थापनेची चर्चा पुढे गेली पाहिजे, अशी पुन्हा एकदा राऊत यांनी शिवसेनेची आग्रही भूमिका मांडली. आम्ही व्यापार करायला बसलेलो नाही, शिवसेनेचा राजा, नेता, कार्यकर्ते काही व्यापारी नाहीत, अशा शब्दांत संजय राऊत यांनी भाजपला टोला लागावला आहे.