फडणवीस-पवार सरकार बेकायदेशीर: चव्हाण - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, November 24, 2019

फडणवीस-पवार सरकार बेकायदेशीर: चव्हाण

https://ift.tt/2OIFxz2
नवी दिल्ली: फडणवीस-पवार हे नवं सरकार बेकायदेशीर असून या सरकार एक क्षणही सत्तेवर राहण्याचा अधिकार नसल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर व्यक्त केली आहे. ते प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. राज्यात सत्ता स्थापनेदरम्यान घोडेबाजाराला ऊत येऊ नये यासाठी लवकरात लवकर बहुमत सिद्ध करण्याचे आदेस द्यावेत, अशी आमची सुप्रीम कोर्टात मागणी केल्याचेही चव्हाण म्हणाले. सुप्रीम कोर्ट या प्रकरणी योग्य न्याय देईल, याचा आम्हाला विश्वास असल्याचेही ते म्हणाले. उद्या सुप्रीम कोर्टात आम्ही आमची बाजू मांडणार असून, अजित पवार यांनी आमदारांच्या पत्राचा अनधिकृत वापर केला असे राष्ट्रवादी काँग्रेस सुप्रीम कोर्टात सिद्ध करणार आहे. आम्हाला किती आमदारांचा पाठिंबा आहे हे देखील आम्ही सुप्रीम कोर्टात सिद्ध करू. या प्रमाणेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यपाल यांनादेखील आवश्यक ती कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. फडणवीस-पवार सरकारला लवकरात लवकर बहुमत सिद्ध करण्यास सांगावे अशी आमची मागणी होती. मात्र, बहुमत हे विधिमंडळातच सिद्ध होईल असे कोर्टाने म्हटले आहे, अशी माहिती चव्हाण यांनी दिली. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि कांग्रेसकडून अशी मागणी होत असताना, सरकारकडून मात्र काही तांत्रिक मुद्दे उपस्थित करत आमच्या मागणीला फाटा देण्याचा प्रयत्न सरकारतर्फे करण्यात आला, असे चव्हाण म्हणाले. त्यांचा कार्यक्रम आपटलाही आणि आटोपलाही- आशीष शेलार फडणवीस-पवार शपथविधिविरोधात जे सुप्रीम कोर्टात गेले ते तोंडावर आपटले असून त्यांचा कार्यक्रम आपटलाही आहे आणि आटोपलाही आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे नेते आशीष शेलार यांनी सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीनंतर व्यक्त केली. विरोधकांच्या आजच्या आज बहुमत सिद्ध करण्याचे आदेश द्यावेत या मागणीच्या बाजूने न्यायालयाने निर्णय दिलेला नाही, असे सांगताना अजित पवार आणि राज्यपालांना स्वत:चे म्हणणे मांडण्याची संधी सुप्रीम कोर्टाने दिलेली असल्याचे शेलार म्हणाले. अजित पवार यांचे गटनेतेपद वैध असून त्यांचाच व्हीप सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना बंधनकारक असेल. यामुळे आम्ही नव्या गटनेत्याची नियुक्ती केली असून त्यानुसार निर्णय घेण्याचा प्रयत्न करू पाहणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुप्रीम कोर्टाकडून अपेक्षित आदेश मिळू शकला नाही, असे शेलार म्हणाले. स्वार्थापोटी सर्व घटनात्मक पदांना बदनाम करण्याचे काम शिवसेना करत असून राज्यपाल आणि राष्ट्रपतिपदाची जाणून बुजून बदनामी करण्याचा आम्ही निषेध करतो. हे राज्यात चालणार नाही असे शेलार म्हणाले. सभागृहात आम्हीच बहुमत सिद्ध करू आणि स्थिर सरकार देऊ असा विश्वासही आशीष शेलार यांनी व्यक्त केला.