कसा आहे रितेश-सिद्धार्थचा मरजावां? वाचा रिव्ह्यू - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, November 16, 2019

कसा आहे रितेश-सिद्धार्थचा मरजावां? वाचा रिव्ह्यू

https://ift.tt/2rP7n54
कल्पेशराज कुबल मिलाप झवेरी हे बॉलिवूडपटांच्या मसालेदार लेखनासाठी नावाजलेलं नाव आहे. 'लार्जर दॅन लाइफ' विश्व पडद्यावर मांडण्यात त्याचा हातखंडा आहे. पण दुर्दैवाने ''ची ही भट्टी तितकीशी जमलेली नाही. ऐंशी-नव्वदच्या दशकातील बॉलिवूडपटांचा मिलाफ 'मरजावां'मध्ये दिसतो. अण्णा (नासर) सारख्या टँकर माफियाला रघू (सिद्धार्थ मल्होत्रा) लहानपणी गटार-नाल्याजवळ एकटा सापडलेला असतो. तेव्हापासून रघू अण्णांच्या सावलीतच लहानाचा मोठा होतो. अण्णाची गुन्हेगारी पार्श्वभूमी त्याच्या अंगीसुद्धा भिनलेली आहे. अण्णा देखील त्याला आपल्या मुलासारखा मानत असतो. परंतु, अण्णांचा खरा मुलगा विष्णू () मात्र रघूचा कमालीचा द्वेष करत असतो. शारीरिकदृष्ट्या बुटका असल्याने त्याला असे वाटते की, अण्णांचा खरा वारस मी असूनही हा सन्मान रघूला मिळतोय. पण, असे असले अण्णाची संपूर्ण वस्ती रघूवर प्रेम करत असते. बार डान्सर आरजू (रकुल प्रीत) आणि रघूच्या तीन मित्रांचं रघूवर जीवापाड प्रेम असतं. पण, एका वळणावर रघूचे संपूर्ण आयुष्यच बदलून जाते जेव्हा त्याची भेट काश्मीरहून आलेल्या जोयाशी (तारा सुतारीया) होते. रघूमध्ये नेमके काय बदल होतात? विष्णू आणि रघू यांच्यातील वैर कोणत्या टोकाला जाते? हे पाहणे काहीसे मनोरंजक असले तरी पटकथेच्या तथ्यहीन विस्तारामुळे ते कंटाळवाणे वाटते. प्रेम, बदला, त्याग, मारामारी आणि मेलोड्रामा असे सर्वकाही दिग्दर्शक मिलाप जवेरीने सिनेमात भरले आहे. परंतु, सिनेमातील अनेक ट्रॅक आपल्याला यापूर्वी कुठेना कुठे तरी पाहिल्याचे जाणवते. नायक आपल्या नायिकेला ठार मारतो, हे वगळल्यास सिनेमात फार काही नाविन्य नाही. 'मैं मारूंगा डर जाएगा, दोबारा जन्म लेने से मर जाएगा', 'जुम्मे की रात है, बदले की बात है, अल्लाह बचाए तुझे मेरे वार से'सारखे संवाद लक्षात राहतात. पण, एकंदर सिनेमा म्हणून आपल्यावर परिणाम होत नाही. सिनेमात दमदार अॅक्शन असली तरीही फार काळ ते आपल्या पचनी पडत नाही. सिद्धार्थ मल्होत्राने रघूची भूमिका उत्तमरित्या साकारली आहे, पण त्याच्या भूमिकेतील बारकावे आणि पटकथेतील संदर्भ भूमिकेला उंचावण्यात कमी पडले आहेत. बुटक्याच्या भूमिकेतील रितेशने आपली व्यक्तिरेखा सक्षमपणे साकारली आहे. छायांकन रेखीव झाले आहे. किमान मनोरंजन करणारा 'मरजावां' एकदा बघायला हरकत नाही.