मुंबई: भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी मुख्यमंत्री यांनी शिवतीर्थावर जाऊन शिवसेनाप्रमुख दिवंगत यांच्या स्मृतींना अभिवादन केले. सकाळपासून शिवसेनेबरोबरच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी शिवतीर्थावर जात बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना अभिवादन केले असताना भारतीय जनता पक्षाच्या मात्र एकही नेत्याने शिवतीर्थावर हजेरी लावलेली नव्हती. मात्र, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि यांनी शिवतीर्थावर येत याबाबतच्या चर्चेला पूर्णविराम दिला. दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मतींना अभिवादन केल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रसारमाध्यमांशी न बोलताच निघून गेले. मात्र, असे असले तरी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अभिवादनासाठी आले असताना स्वागतासाठी शिवसेनेतील कुणीही मोठा नेता शिवतीर्थावर हजर नव्हता. शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले. पंकजांकडून युतीचा उल्लेख फडणवीस यांच्याव्यतिरिक्त माजी मंत्री विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांनी शिवतीर्थावर बाळासाहेबांना आदरांजली वाहिली. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे भाजप-शिवसेना युतीचे श्रद्धास्थान असल्याचा उल्लेख पंकजा मुंडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. आज बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाची आम्हाला कमतरता जाणवत असून त्यांच्या विचारांवर आम्ही चालत असून पुढेही चालत राहू, असे पंकजा म्हणाल्या. प्रत्येक भाजप कार्यकर्त्यांच्या मनात बाळासाहेबांबद्दल आदर बाळासाहेब हे भाजप शिवसेनेचे कुटुंबप्रमुख होते. प्रत्येक भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आदर आहे, अशा शब्दांत भाजप नेते आणि माजी मंत्री विनोद तावडे यांनी बाळासाहेबांना आदरांजली वाहिली.