मुंबई: महापौर निवडणुकीतून भाजपची माघार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, November 18, 2019

मुंबई: महापौर निवडणुकीतून भाजपची माघार

https://ift.tt/37h5LkQ
मुंबई: मुंबई महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीतून भारतीय जनता पक्षानं माघार घेतली आहे. महापौर निवडून आणण्यासाठी अपेक्षित संख्याबळ नसल्यानं या निवडणुकीत अर्ज न देण्याचा निर्णय भाजपनं घेतला आहे. मात्र, २०२२ साली मुंबई महापालिकेत भाजपचाच महापौर बसेल, असा विश्वासही व्यक्त केला आहे. राज्यातील सत्तावाटपाच्या मुद्द्यावरून भाजप-शिवसेनेची युती तुटली आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीशी जुळवून घेतलं असून राज्यात सत्तास्थापनेची तयारी केली आहे. त्यामुळं संतापलेल्या शिवसेनेला एनडीएतून बाहेर काढल्याची अधिकृत घोषणाच भाजपनं केली आहे. या साऱ्या राजकारणाचे पडसाद मुंबई महापालिकेच्या राजकारणात उमटणार, असं मानलं जात होतं. मात्र, ही चर्चा फोल ठरली आहे. भाजपचे मुंबईतील खासदार मनोज कोटक यांनी आज याबाबत पक्षाच्या भूमिकेची माहिती दिली. 'महापौर निवडून आणण्याइतकं संख्याबळ सध्या भाजपकडे नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं आकड्याचा खेळ करण्यात आम्हाला रस नाही. आमचे नगरसेवक मुंबईकरांना सेवासुविधा देण्याचं काम करतच राहतील आणि या कामाच्या व भविष्यातील संख्येच्या बळावर २००२ साली मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर नक्की बसवू, असा विश्वास कोटक यांनी व्यक्त केला. अजूनही आशेवर? मुंबई महापालिकेत भाजपकडेही शिवसेनेच्या तोडीची सदस्यसंख्या आहे. मात्र, सेनेला मात देऊन महापौर निवडून आणण्यासाठी भाजपला इतर पक्षांची मदत लागणार आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा समाजवादी पक्षाकडून भाजपला तशी मदत मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे. शिवाय, भाजप-शिवसेना युती पुन्हा होईल, अशी आशाही राज्यातील भाजपच्या नेतृत्वाला आहे. त्यामुळंच तूर्त थेट शिवसेनेच्या विरोधात निवडणूक न लढण्याची भूमिका घेण्यात आली असावी, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे. महापालिकेतील पक्षीय बलाबल ९४ भाजप ८२ काँग्रेस २९ राष्ट्रवादी ८ समाजवादी पक्ष ६ मनसे १