Live: शिवसेना एनडीएतून बाहेर पडणार? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, November 11, 2019

Live: शिवसेना एनडीएतून बाहेर पडणार?

https://ift.tt/2NADCxd
मुंबई: राज्याचे राज्यपाल कोश्यारी यांनी शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिल्यानंतर सस्ता स्थापनेच्या हालचालींना मोठा वेग आला आहे. शिवसेनेचे केंद्रातील मंत्री अरविंद सावंत यांनी राजीनामा दिला आहे, तर आज दिवसभरात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवेसना आणि भाजपच्या बैठकाही होत आहेत. जाणून घेऊया राजकीय घडामोडींचे क्षणोक्षणीचे अपडेट्स... लाइव्ह अपडेट्स: >> भारतीय जनता पक्षाचे निवेदन दु:खद- संजय राऊत >> मुंबई: भाजप सत्ता स्थापन करू शकला नाही याचे खापर शिवसेनेवर फोडणे अयोग्य- संजय राऊत >> शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांची पत्रकार परिषद सुरू >> मुंबई: सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेच्या गोटात हालचालींना मोठा वेग >> दिल्लीत सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात सुरू होतेय काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक >> मुंबईत थोड्याच वेळात राष्ट्रवादी काँग्रस पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक सुरू होणार >> दिल्लीत थोड्याच वेळात सुरू होणार काँग्रेसची बैठक >> मुंबई: सत्ता स्थापन करण्याच्या दिशेने शिवसेनेच्या हालचाली सुरू; मालाड परिसरातील हॉटेल द रिट्रीटमध्ये होणार आमदारांची बैठक >> दिल्ली: शिवसेना नेते अरविंद सावंत यांचा केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा; ट्विटरवरुन दिली माहिती