मुंबई: तब्बल २० दिवसांच्या नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर अखेर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. राज्यातील प्रमुख पक्षांना सत्तास्थापनेचा पेच सोडवता न आल्यानं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी हा निर्णय घेतला. अर्थात, त्यानंतरही युती व आघाडीतील पक्षांना सत्तास्थापनेची संधी असल्यानं जुळवाजुळव सुरूच राहणार आहे. लाइव्ह अपडेट्स: >> सत्तास्थापनेसाठी पुरेशी मुदत न देण्याच्या व राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या विरोधात शिवसेनेनं सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणीची शक्यता >> शिवसेना नेते संजय राऊत यांचं नवं सूचक ट्विट >> राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची आज सकाळी दहा वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये बैठक >> मुंबईतील ट्रायडण्ट हॉटेलात मंगळवारी रात्री उशिरा भेट झाल्याची सूत्रांची माहिती >> शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे सल्लागार अहमद पटेल यांच्यात चर्चा >> जयपूरमध्ये असलेले काँग्रेसचे आमदार आज मुंबईला परतणार >> राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतरही राज्यात राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरूच