Live: हा बाळासाहेबांचा आणि महाराष्ट्राचा अपमान; संजय राऊत यांचं अमित शहांना प्रत्युत्तर - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, November 14, 2019

Live: हा बाळासाहेबांचा आणि महाराष्ट्राचा अपमान; संजय राऊत यांचं अमित शहांना प्रत्युत्तर

https://ift.tt/32MOPPu
मुंबई: तब्बल २१ दिवसांच्या नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर अखेर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. राज्यातील प्रमुख पक्षांना सत्तास्थापनेचा पेच सोडवता न आल्यानं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी हा निर्णय घेतला. अर्थात, त्यानंतरही युती व आघाडीतील पक्षांना सत्तास्थापनेची संधी असल्यानं जुळवाजुळव सुरूच राहणार आहे. लाइव्ह अपडेट्स: >> आमची वृत्ती व्यापारी नाही. आम्ही कधीही ओरबाडून घेतलं नाही. महाराष्ट्र ओरबाडून खात नाही. - राऊत >> मंदिरात झालेली चर्चा कोणी नाकारत असेल तर तो बाळासाहेबांचा आणि महाराष्ट्राचा अपमान आहे - राऊत >> ज्या खोलीत चर्चा झाली, ती सामान्य खोली नव्हती. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची खोली होती. आमच्यासाठी ते मंदिर आहे. त्या मंदिरात ही चर्चा झाली होती. - राऊत >> पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आम्हीही आदर करतो - राऊत >> बंद दाराआड ठरलेल्या गोष्टी प्रत्यक्षात येत नसल्यानं त्या चव्हाट्यावर आल्या आहेत, राऊत यांचा अमित शहा यांना प्रत्युत्तर >> बंद दाराआड जे ठरलं होतं, ते अमित शहा यांनी पंतप्रधानांना सांगायला हवं होतं. >> देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री होणार हे अमित शहा कधीच बोलले नव्हते. पंतप्रधान मोदी तसं एकदा म्हणाले होते - राऊत >> लोकसभेपर्यंत सर्व शांत होते. विधानसभेचा निकाल लागला की लगेच फिरले - >> शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार हे उद्धव ठाकरेसुद्धा प्रत्येक सभेत सांगायचे - संजय राऊत >> शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद सुरू