
Uric Acid : युरिक एसिड शरीरात तयार होणारे असे केमिकल जे आपल्या खाण्या-पिण्याच्या वस्तू आणि पेशींपासून तयार होतो. युरिक एसिड रक्तातून किडनीतून लघवीच्याद्वारे बाहेर पडते. जर शरीरात युरिक एसिडचे प्रमाण जास्तच वाढले तर किडनीतून ते बाहेर पडले नाही. तर याची पातळी असामान्य रुपाने वाढते. अधिक प्रोटीन युक्त आहार, मद्याचे सेवन, लठ्ठपणा, चुकीची जीवनशैली आणि पुरेसे पाणी न प्यायल्याने युरिक एसिड वाढते. तसेच काही आजार, औषधे देखील याची पातळी वाढवू शकतो. युरिक एसिड वाढल्याने शरीराच्या अवयवात सूज आणि वेदना निर्माण होते.
उच्च युरिक एसिडने सर्वसाधारण समस्या म्हणजे संधीवात होतो. ज्यात सांध्यात प्रचंड वेदना आणि सूज येते. याशिवाय एसिड किडनी स्टोनचे देखील कारण बनू शकते.ज्यामुळे लघवीला त्रास, वेदना आणि संक्रमण होऊ शकते. दीर्घकाळ युरिक एसिड वाढल्याने हार्ट अटॅक, हायब्लडप्रेशर आणि किडनीच्या गंभीर समस्या होऊ शकतात. शरीरातील सूज आणि ऑक्सीडेटिव्ह तणावाला वाढवते. ज्यामुळे हाडांवर आणि स्नायूंवर परिणाम होतो. अशात अनेकदा लोक सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे हा आजार हळूहळू गंभीर स्वरुप धारण करत असतो.
यूरिक एसिड वाढल्याची लक्षणे काय ?
आरएमएल हॉस्पिटलचे मेडिसिन विभागाचे डॉ. सुभाष गिरी सांगतात की युरिक एसिड वाढल्याची सुरुवातीची लक्षण हलकी असतात. आणि लोकांना सामान्य थकवा किंवा सांधेदुखी समजतात. सर्व साधारण लक्षणात सांध्यात अचानक दुखणे किंवा सूज येते. खास करुन अंगठा, गुडघा आणि टाचांमध्ये दुखते. यासोबतच, सांधे लालसर होणे, उष्ण वाटणे आणि कडकपणा जाणवणे हे देखील त्रास होतात.
गंभीर प्रकरणात संधीवाताचा झटका वेगाने आणि अचानक वेदनेसह येतो. रात्रीच्या वेळी दुखणे जास्त वाढत असते. काही लोकांनी किडनी स्टोन,लघवीत जळजळ किंवा वारंवार लघवीला येण्याची समस्या निर्माण होते. याशिवाय थकवा, स्नायू कमजोर होतात. कधी कधी तापासारखे वाटते. जर ही लक्षणे वारंवार दिसू लागली तर लागलीच डॉक्टरांना दाखवून तपासणी आणि उपचार करुन घ्यावेत. कारण जर दुर्लक्ष केले तर दीर्घकाळ हे दुखणे सहन करावे लागू शकते.
यूरिक एसिड कसे नियंत्रित करावे –
प्रोटीन आणि हाय-प्यूरिन युक्त आहार कमी करावा
दिवसभरात किमान 7 ते 8 ग्लास पाणी प्यावे
शर्करा असलेले ड्रिंक आणि मद्यापासून दूर रहा
नियमित रूपाने हलका व्यायाम करा, वा वॉक करा
लठ्ठपणा आणि वजन कमी करण्यासाठी हेल्दी डाएट स्वीकारा
डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे आणि सप्लिमेंट घ्या
स्ट्रेस कमी करण्यासाठी योग आणि मेडिटेशन करा