LIVE: राष्ट्रवादीचे बेपत्ता ३ आमदार दिल्लीहून परतले - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, November 25, 2019

LIVE: राष्ट्रवादीचे बेपत्ता ३ आमदार दिल्लीहून परतले

https://ift.tt/34hpzCH
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अजित पवार यांनी बंडखोरी केल्याने गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या राजकारणला वेगळीच राजकीय कलाटणी मिळाली आहे. अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी करत राजभवनात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. अजित पवारांनी दिलेल्या धक्क्यानंतर शरद पवारांनी पुन्हा एकदा पक्षाला सावरण्यासाठी सर्वांना एका छताखाली आणण्याचं काम सुरू केलं. अजित पवारांसोबत शपथविधीला उपस्थित असलेले आमदार एकामागोमाग राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटात परत येऊ लागले आहेत. तर दुसरीकडे अजित पवार यांनी बंडाचे निशाण कायम ठेवत ट्विटरवर पंतप्रधानांपासून केंद्रय गृहमंत्र्यासहीत भाजपच्या अनेक बड्या नेत्यांचे आभार व्यक्त केले आहेत. सुप्रीम कोर्टात शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादीने दाखल केलेल्या याचिकेवरही आज सुनावणी होणार आहे. याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. जाणून घेऊयात लाइव्ह अपडेट्स... >> आमदार अनिल पाटील, नरहरी जिरवळ आणि दौलत दरोडा दिल्लीहून मुंबईत दाखल, राष्ट्रवादीचे इतर आमदार असलेल्या हयात हॉटेलमध्ये तिन्ही आमदार परतले. >> अजित पवार यांच्याकडे आता फक्त पिंपरी-चिंचवडचे आमदार अण्णा बनसोडे, इतर सर्व आमदार राष्ट्रवादीच्या गोटात दाखल >> अजित पवारांसोबत शपथविधीला उपस्थित असलेले आणि गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आणखी तीन आमदार मुंबईत परतले.