मुंबई: महाराष्ट्रात अकस्मात स्थापन झालेल्या देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकारविरुद्ध शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने केलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय आज, मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता निर्णय देणार आहे. सोमवारी सकाळी दीड तास चाललेल्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला. बहुमत नसताना घाईघाईने शपथविधी सोहळा उरकणाऱ्या फडणवीस सरकारवरील विश्वासमताची तारीख लवकरात लवकर निश्चित करण्यात यावी, अशी या तिन्ही पक्षांची मागणी आहे. जाणून घ्या या सगळ्या राजकीय घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स... Live अपडेट्स: >> भाजपच्या कोअर कमिटीची सकाळी ११ वाजता 'वर्षा' बंगल्यावर बैठक >> शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने केलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय आज सकाळी साडेदहा वाजता निर्णय देणार