एकनाथ खडसेंना शरद पवारांकडून मोठा धक्का - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, December 21, 2019

एकनाथ खडसेंना शरद पवारांकडून मोठा धक्का

https://ift.tt/392fpbW
औरंगाबाद: ' हे मला भेटले होते. त्यांच्याशी माझी चर्चाही झाली. पण त्यांचं समाधान करण्याएवढी साधनसामुग्री सध्या तरी माझ्याकडं नाही,' असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांनी स्पष्ट केलं आहे. पवारांची ही भूमिका म्हणजे भाजपला धक्का देण्याच्या तयारीत असलेल्या खडसेंनाच धक्का असल्याचं बोललं जात आहे. औरंगाबादमध्ये पक्षाच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. भाजपवर नाराज असलेल्या व गोपीनाथ गडावर झालेल्या जाहीर मेळाव्यात राज्यातील नेतृत्वावर तोफ डागणाऱ्या खडसे यांनी दोन दिवसांपूर्वी नागपूर येथे पवारांची गुप्त भेट घेतली होती. त्यामुळं त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चेला हवा मिळाली होती. औरंगाबाद येथे पत्रकारांनी शरद पवार यांना त्याबाबत विचारलं असता त्यांनी चर्चेतील हवाच काढून टाकली. 'खडसे हे मला भेटले होते. माझी त्यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. मात्र, त्यांचं समाधान करण्याइतपत साधनसामुग्री माझ्याकडं नाही,' असं ते म्हणाले.

पवारांच्या या वक्तव्यामुळं आता खडसे नेमकी काय भूमिका घेणार, याकडं लक्ष लागलं आहे. अर्थात, खडसे यांनी याआधीच आपण पक्षात राहणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. तसंच, भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी देखील खडसे यांची नाराजी दूर करण्यात येईल, असं म्हटलं होतं. त्यामुळं खडसे यांच्या गाठीभेटी हे पक्षावर दबाव वाढवण्याचं तंत्र आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे.