
विशाखापट्टणम: वेस्ट इंडिज संघाकडून पहिल्या वनडेत पराभवाचा धक्का बसल्यानंतर भारतीय संघाची झोप उडाली आहे. रविवारी चेन्नईत झालेल्या पहिल्या वनडेत विंडीजने टीम इंडियावर शानदार विजय मिळवला होता. आता मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी विराट आणि कंपनीला दुसऱ्या सामन्यात विजय मिळवणे आवश्यक आहे. विशाखापट्टणम येथे आज दुपारी होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात छोटीशी चूक देखील टीम इंडियाला महागात पडू शकते. पहिल्या वनडेत पराभव झाल्यानंतर टीम इंडियामधील त्रुटी अचानक समोर आल्या आहेत. पहिल्या वनडे सारख्या चूका केल्या तर भारतीय संघ मालिका गमवू शकतो. विजय मिळवण्यासाठी भारतीय संघाला समन्वय ठेवणे आवश्यक आहे. वाचा- गेल्या १५ वर्षापासून भारतीय संघाने घरच्या मैदानावर द्विपक्षीय मालिका गमावलेली नाही. इतक नव्हे तर भारतीय संघाना आतापर्यंत कधीच पाच वनडे सामन्यात पराभव स्विकारलेला नाही. आजच्या सामन्यात भारताचा पराभव झाला तर या दोन्ही गोष्टी इतिहास जमा होतील. ऑस्ट्रेलियाविरुद्ध यावर्षी मार्च महिन्यात झालेल्या पाच सामन्यांच्या मालिकेतील अखेरचे तीन सामने भारताने गमावले होते. तर वेस्ट इंडिजविरुद्धचा पहिला सामना भारताने गमावला आहे. गोलंदाजीवर प्रश्न चिन्ह चेन्नई वनडेत खराब सुरुवातनंतर श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत जोडीने भारताला २८८ या सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवले होते. पण हेटमायर आणि होप जोडीने भारतीय गोलंदाजांचा समाचार घेतला. या जोडीसमोर भारतीय गोलंदाजी फिकी पडली. चेन्नईत विराटने सहा गोलंदाजांचा वापर केला पण त्याचा परिणाम काही झाला नाही. चेन्नईच खेळपट्टी संथ असताना देखील २८८ या धावसंख्येचा रक्षण भारताला करता आले नव्हते. त्यामुळे या सामन्यात संघ व्यवस्थापनाला गोलंदाजीकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. वाचा- फिरकीपटू देखील अपयशी संघातील मुख्य जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार जखमी असल्यामुळे संघा बाहेर आहेत. त्यामुळे संघाच्या जलद गोलंदाजीची धार कमी झाली आहे. पण गेल्या सामन्यात फिरकीपटू रविंद्र जडेजा (१० षटक ०-५८) आणि कुलदीप यादव (१० षटक ०-४५) यांना एक ही विकेट घेता आली नाही. या दोघांसोबत शिवम दुबेला देखील यश मिळाले नाही. दुबेने ७.५ षटकात ६८ धावा दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर संघात शार्दुल ठाकूर अथवा युजवेंद्र चहल यांना संधी मिळू शकते. विंडीज आक्रमक पहिल्या सामन्यात शानदार विजय मिळवल्यामुळे वेस्ट इंडिजचा संघ उत्साहात आहे. आजच्या सामन्यात दुप्पट आत्मविश्वासासह ते मैदानात उतरतील. हेटमायर आणि होप हेच त्यांचे मुख्य फलंदाज असतील. विडींजने ही मालिका जिंकली तर कर्णधार पोलार्डसाठी ती मोठी जमेची बाजू ठरेल. विशाखापट्टणमची खेळपट्टी फलंदाजीसाठी उत्तम मानली जाते. सुरुवातीला खेळपट्टी संथ असेल त्यानंतर फलंदाजी करणे सोप जाईल.