
मुंबईः भारतीय जनता पार्टीने ऐनवेळी अर्ज मागे घेतल्याने विधानसभा अध्यक्षपदी काँग्रेसचे यांच्या विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. आज सकाळी ११ वाजता याची अधिकृत घोषणा होणार आहे. भाजपकडून यांनी तर काँग्रेसकडून नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आज सकाळी ११ वाजता या पदासाठी निवडणूक होणार होती. परंतु, भाजपने या निवडणुकीतून माघार घेतल्याने नाना पटोले यांची विधानसभा अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड होणार आहे. भाजपने या निवडणुकीतून माघार घेतल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. विधानसभा अध्यक्ष हा बिनविरोध व्हावा ही महाराष्ट्राची परंपरा आहे. विधानसभा अध्यक्षांची निवड यंदाही बिनविरोध व्हावी यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी आग्रह धरला होता. त्यामुळे मी व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर व सविस्तर चर्चा केली. त्यानंतर भाजपने या निवडणुकीतून माघार घेण्यासंबंधीचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. गेल्या महिनाभरातील नाट्यमय राजकीय घडामोडीनंतर राज्यात सत्तेवर आलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने शनिवारी विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारला १६९ आमदारांचे समर्थन असल्याचेही याद्वारे स्पष्ट झाले. ठरावाप्रसंगी एमआयएमचे दोन तसेच मनसे व माकपच्या प्रत्येकी एका आमदाराने तटस्थ भूमिका घेतली. तर भाजपने सभागृहातून सभात्याग केल्याने विश्वासदर्शक ठराव प्रस्तावाच्या विरोधात शून्य मते पडली. अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळ विस्तार? मंत्रिपदासाठी इच्छुक राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांची संख्या वाढल्यानेच राज्य मंत्रिमंडळ विस्तार नागपूर अधिवेशनानंतर होईल, असे बोलले जात आहे. मात्र, तो अधिवेशनापूर्वीच होईल, असे राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेतील ज्येष्ठ नेते खासगीत सांगत आहेत.