साईचरणी वर्षभरात २८७ कोटींहून अधिक रकमेचे दान - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, December 31, 2019

साईचरणी वर्षभरात २८७ कोटींहून अधिक रकमेचे दान

https://ift.tt/35ef3f0
अहमदनगरः शिर्डीच्या साई समाधी मंदिराच्या देणगीत मागील वर्षाच्या तुलनेत दोन कोटींची वाढ झाली आहे. यंदा साई चरणी तब्बल २८७ कोटींहून अधिक रकमेचे दान प्राप्त झाले असून ऑनलाइन, डेबीट व क्रेडीट कार्डच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या देणग्यांमध्येही लक्षणीय वाढ आहे. जानेवारी ते डिसेंबर २०१८ या वर्षापेक्षा २०१९ या वर्षात यंदा साई चरणी अर्पण करण्यात आलेल्या देणगीमध्ये दोन कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. साई संस्थानच्या उत्पन्नात सातत्याने वाढ होत आहे. प्रत्येक वर्षी साईबाबांच्या चरणी अर्पण करण्यात येणाऱ्या देणगीमध्येही वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. साई संस्थानचे आर्थिक वर्ष हे एप्रिल ते मार्च असे असते. परंतु अनेकांना जानेवारी ते डिसेंबर या कॅलेंडर वर्षात साई संस्थानला किती दान आले, याची उत्सुकता असते. गेल्या कॅलेंडर वर्षाचा विचार केल्यास २०१८ मध्ये साई चरणी २८५ कोटी रुपयांचे दान आले होते. यंदा मात्र यामध्ये वाढ झाली असून २०१९ मध्ये साईबाबांच्या चरणी २८७ कोटी ६ लाख ८५ हजार ४१५ रुपये दान आले आहेत. याशिवाय यावर्षी १९ किलो सोने आणि तब्बल ३९१ किलो चांदीही प्राप्त झाली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा साईबाबांच्या चरणी आलेल्या देणगीमध्ये वाढ झाली आहे. विशेष करून त्यामध्ये परकीय चलन आणि ऑनलाइन, डेबीट-क्रेडीट कार्डच्या माध्यमातून जी देणगी प्राप्त झाली आहे, ती मागील वर्षीपेक्षा जास्त आहे. - दीपक मुगळीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिर्डी संस्थान दृष्टीक्षेपात साईबाबांच्या चरणी अर्पण देणगी: (आकडेवारी जानेवारी २०१९ पासून ते २७ डिसेंबर २०१९ पर्यंत) दक्षिणापेटी – १५६ कोटी ४९ लाख २ हजार ३५० देणगी काऊंटर – ६० कोटी ८४ लाख ८ हजार ५९० चेक-डीडीद्वारे – २३ कोटी ३५ लाख ९० हजार ४०९ मनिऑडर्स – २ कोटी १७ लाख ८३ हजार ५१५ डेबिट/क्रेडिट कार्ड द्वारे – १७ कोटी ५९ लाख ११ हजार ४२४ ऑनलाइन देणगी - १६ कोटी २ लाख ५१ हजार ६०६ परकीय चलन – १० कोटी ५८ लाख ३७ हजार ५२१