एअरटेल ग्राहकांचा रिचार्ज आजपासून महागला - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, December 30, 2019

एअरटेल ग्राहकांचा रिचार्ज आजपासून महागला

https://ift.tt/358HAm4
नवी दिल्लीः भारती एअरटेलने आपला मिनिमम मंथली रिचार्ज प्लान आजपासून महाग केला आहे. एअरटेल ग्राहकांना आजपासून यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. एअरटेलच्या ग्राहकांना दर महिन्याला कमीत कमी ४५ रुपयांचा रिचार्ज करावा लागणार आहे. या आधी एअरटेलच्या ग्राहकांना ३५ रुपयांचा रिचार्ज करावा लागणार होता. परंतु, आता हा रिचार्ज १० रुपयांनी महाग केला आहे. एअरटेलचे नवीन टॅरिफ दर आजपासून लागू करण्यात आले आहेत. या दरवाढीनंतर एअरटेलच्या प्रीपेड ग्राहकांना दर महिन्याला १० रुपये जास्तीचे मोजावे लागणार आहेत. त्यानंतर त्यांना टेलिकॉम ऑपरेटर्सची सेवा मिळू शकणार आहे. आजपासून प्रत्येक २८ दिवसाला कमीत कमी ४५ रुपयांचा रिचार्ज करणे ग्राहकांना गरजेचे आहे. तरच त्यांची सेवा सुरू राहणार आहे, असे कंपनीने रविवारी आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले होते. कंपनीने एक नोटीस काढली असून त्यात ही माहिती दिली आहे. जर एअरटेलचा एखादा ग्राहक ४५ रुपयांचा किंवा त्यापेक्षा जास्त रुपयांचा प्रीपेड रिचार्ज करीत नसेल तर त्याला सेवा न देण्याचा अधिकार कंपनीला असणार आहे. लिमिडेट सर्विस सोबत १५ दिवसांचा ग्रेस पीरियड गिऱ्हाईकांना दिला जाईल. हा ग्रेस पीरियड संपल्यानंतर ग्राहकाची सेवा संपुष्टात आणली जाईल. गेल्या महिन्यात एअरटेल-आयडियाकडून टॅरिफ प्लानमध्ये ४० टक्के वाढ केली आहे. मिनिमम रिचार्ज महाग करण्यात आल्यानं याचा सरळ फटका अशा ग्राहकांना बसणार आहे. जे ग्राहक मंथली रिचार्ज करतात. किंवा जे लाँगटर्म रिचार्ज करीत नाहीत. एअरटेलकडून मागच्या महिन्यात यासंदर्भात घोषणा करण्यात आली होती. मंथली रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांची संख्या कमी करण्यासाठी कंपनीने मिनिमम टॅरिफ ३५ रुपये करीत असल्याचे म्हटले होते.