'पंत सारखा यष्टीरक्षक मी पहिल्यांदाच पाहिला' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, December 15, 2019

'पंत सारखा यष्टीरक्षक मी पहिल्यांदाच पाहिला'

https://ift.tt/2PmpxnV
मोहिंदर अमरनाथ टी-२० मालिकेनंतर आता आपण वनडे मालिकेकडे कूच करणार आहोत. वेस्ट इंडिज संघात चांगले खेळाडू आहेत; पण वनडेमध्ये हा संघ काहीसा तोट्यात असेल असे माझे मत आहे. टी-२०मध्ये ते अधिक उजवे खेळतात. वनडेचे पारडे मात्र भारताच्या बाजूने आहे; कारण विराटचा संघ ताकदीचा आहे. पूर्वी ८०च्या दशकात उलट चित्र दिसे. विंडीज संघ भारताच्या तुलनेत जेतेपदासाठी फेव्हरिट समजला जाई. आता भारतीय संघ जेतेपद पटकावले, असा मतप्रवाह आहे ते विराट आणि कंपनीच्या सातत्यामुळे. पाहुण्या वेस्ट इंडिज संघात तरुण गुणवत्ता आहे; पण अनुभव आणि सातत्य याची कमतरता त्यांच्या संघात दिसते. भारतीय संघाची भट्टी मस्त जमून आली असून संघातील महत्त्वाचे खेळाडूदेखील फॉर्मात आहेत. कर्णधार विराट कोहलीच पुढाकार घेत कामगिरी करत असल्याने इतर सहकारीदेखील प्रोत्साहित होतात. तेज गोलंदाज मोहम्मद शमीने मला खासकरून प्रभावीत केले आहे. या सगळ्यांत भारतीय संघात सध्या चिंतेचा मुद्दा आहे तो यष्टीरक्षणाचा. ऋषभ पंतने संयमाने शांतचित्ताने खेळ करायला हवा. त्याच्यात गुणवत्ता आहे; पण दडपणाखाली तो सातत्य हरवून बसला आहे. प्रत्येकवेळी आपले फटके किती ताकदीचे आहेत, त्यात किती विविधता आहे याचे प्रात्यकक्षित नाही केले तरी चालेल. मात्र संयमाचे प्रदर्शन त्याच्याकडून व्हायला हवे. हे झाले फलंदाजीचे; पण पंतचे यष्टीरक्षणही सदोष आहे. तिथेही संयम महत्त्वाचा आहे. स्टम्पच्या आधी चेंडू कलेक्ट करण्याचा आततायीपणा करणारा यष्टीरक्षक मी पहिल्यांदाच पाहिला. त्याने आपल्या तंत्र घोटवून घ्यायला हवे. पंतच्या गुणवत्तेवर शंका नाही; पण त्याने आपल्या आणि संघाच्या भल्यासाठी आपल्या खेळात काही बदल करायलाच हवेत. अन्यथा संजू सॅमसन प्रतीक्षेत आहेच... (गेमप्लान)