... म्हणून धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद हुकणार? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, December 25, 2019

... म्हणून धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद हुकणार?

https://ift.tt/2Qd1maQ
मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार यांना मंत्री झाल्यानंतर भगवानगडावर येण्यासाठी गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी निमंत्रण दिलं आहे. पण धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद हुकण्याची शक्यता आहे. कारण, त्यांच्या नावाला प्रदेशाध्यक्षपदासाठी पसंती दिली जाऊ शकते, असं सूत्रांचं म्हणणं आहे. काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, तर राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे यांना प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यापूर्वीच मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून दुसरा प्रदेशाध्यक्ष नियुक्त केली जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सभा गाजवणारे धनंजय मुंडे यांच्या नावाला पक्षातील अनेकांची पसंती आहे. धनंजय मुंडेंच्या नेतृत्त्वगुणांचा पक्षाच्या संघटनासाठी फायदा होऊ शकतो, असा अंदाज बांधला जात आहे. धनंजय मुंडे यांची राष्ट्रवादीचे फायरब्रँड नेते म्हणून ओळख आहे. परळीतल्या अत्यंत प्रतिष्ठेच्या लढाईत त्यांनी बाजी मारली आणि पहिल्यांदाच विधानसभा गाठली. त्यामुळे मंत्रिमंडळात त्यांचा समावेश हा निश्चित मानला जात होता. अत्यंत प्रतिष्ठेच्या असलेल्या भगवानगडावर येण्यासाठीही धनंजय मुंडेंना निमंत्रण मिळालं. स्वतः धनंजय मुंडे यांनीच सोशल मीडियाद्वारे याची माहिती दिली होती. पण पक्ष धनंजय मुंडे यांना वेगळीच जबाबदारी देण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी पृथ्वीराज चव्हाण ? महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये काँग्रेसकडून विद्यमान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे काँग्रेस आता राज्याची धुरा पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे देण्याची शक्यता आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्रात काँग्रेसचं नेतृत्त्व करावं, अशी इच्छा खुद्द काँग्रेस हायकमांडचीच असल्याचं सांगितलं जात आहे.