
मुंबई- बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमारने गृहमंत्री अमित शाह यांना आरोग्याशी निगडीत एक सल्ला दिला आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात त्याने हा सल्ला दिला. यावेळी अँकरने अक्षयला अमित शाह यांना तुला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकतोस असं सांगितलं. यावर अक्षयने खूप विचार केला. पण त्याच्या मनात कोणताही विचार आला नाही. यानंतर तो बोलला की, प्रश्न नाहीये पण एक सल्ला नक्की देऊ इच्छितो. त्यांनी संध्याकाळी ६.३० नंतर शक्यतो काहीही खाऊ नये. आपल्या शास्त्रातही सूर्यास्तानंतर काहीही न खाण्याबद्दल सांगितलं आहे. यात काहीही चुकीचं नाहीये आणि फिट राहण्यासाठी हे चांगलंही असतं. याशिवाय अक्षय कुमार म्हणाला की, देशासाठी ते अत्यंत महत्त्वाचे असल्यामुळे त्यांनी स्वतःच्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. नागरिकतेच्या प्रश्नावर बोलला अक्षय कुमार- एकवेळ अशी होती की, माझे सलग १४ सिनेमे आपटले होते. यानंतर मी कॅनडामध्ये जाऊन काम करण्याचा निर्णय घेतला होता. माझा मित्र तिथे रहायचा. मी त्याला फोन केला आणि कॅनडाचा पासपोर्ट घेतला. त्यानंतर माझा १५ वा सिनेमा हिट झाला आणि मी कधी कॅनडाला गेलो नाही. इतकी वर्ष मी काम करत राहिलो त्यामुळे या गोष्टीकडे माझं लक्ष कधी गेलं नाही. आता यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मी एक भारतीय आहे यात कोणताही वाद नाही. प्रत्येकवेळी माझ्या नागरिकतेवर प्रश्न उपस्थित केले जातात. पण मला एक गोष्ट कळत नाही की यात एवढा हंगामा करण्याची गरज काय...