नागरिकत्व: प. बंगालमध्ये BJP-RSSचा 'हा' प्लान - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, December 18, 2019

नागरिकत्व: प. बंगालमध्ये BJP-RSSचा 'हा' प्लान

https://ift.tt/2YY67Ji
कोलकाता: नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून देशभरातील विविध ठिकाणी तीव्र निदर्शनं सुरू असतानाच, आता भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं पश्चिम बंगालमध्ये एक नवी मोहीम हाती घेण्याचं निश्चित केलं आहे. या मोहिमेंतर्गत आता मुस्लीम समाजापर्यंत पोहोचणार आहे. या मोहिमेच्या माध्यमातून नागरिकत्व कायद्यामुळं तुम्ही कसे सुरक्षित आहात, त्यांच्या नागरिकत्वाला कोणताही धोका नाही याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला पश्चिम बंगालमध्ये जोरदार विरोध होत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत हिंसक निदर्शनं आणि जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर नागरिकत्व कायद्याबाबत जागृती करण्यासाठी भाजप आणि संघानं राज्यभरात नवी मोहीम हाती घेण्याची योजना आखली आहे. प्रत्येक विभागात मोहीम राबवण्यात यावी, असं संघानं स्वयंसेवकांना सांगितलं आहे. विशेषतः मुस्लीम समाजात गैरसमज पसरवला गेला आहे. त्यांच्यापर्यंत चुकीची माहिती पोहोचवण्यात आली आहे. त्यामुळं त्यांच्यात या कायद्याबाबत जागृती करण्याची आवश्यकता आहे, असं संघाच्या एका पदाधिकाऱ्यानं सांगितलं.

दक्षिण बंगाल आणि कोलकातामध्ये मोहीम सूत्रांच्या माहितीनुसार, संघानं बंगालच्या दक्षिण भागात आणि कोलकातामध्ये नागरिकत्व कायद्यातील तरतुदींबाबत माहिती देण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. ज्या मुस्लिमांकडे भारतातील वास्तव्याचे वैध दस्तावेज आहेत, त्यांना काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही, असं संघाच्या एका पदाधिकाऱ्यानं सांगितलं आहे. ममता म्हणाल्या, लागू करणार नाहीच! पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री यांनी या मुद्द्यावरून भाजपवर निशाणा साधला आहे. ममता यांनी काल, सोमवारी एका रॅलीला संबोधित करताना लागू करणार नाही, असं ठणकावून सांगितलं होतं. 'अखेरच्या श्वासापर्यंत बंगालमध्ये एनआरसी आणि नागरिकत्व कायदा लागू करणार नाही,' असं त्या म्हणाल्या होत्या. सबका साथ, सबका विकास या घोषणेवरूनही भाजपवर त्यांनी टीकास्त्र सोडलं होतं. तुमची साथ नसेल तर विकास कसा होईल? आपण सर्व नागरिक आहोत. सामाजिक सलोखा हे आपलं लक्ष्य आहे. आम्ही एनआरसी आणि नागरिकत्व कायदा कधीच मान्य करणार नाही, असंही त्या म्हणाल्या.