सांभाळा! सौंदर्यप्रसाधनांमध्ये घातक रसायने - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, December 4, 2019

सांभाळा! सौंदर्यप्रसाधनांमध्ये घातक रसायने

https://ift.tt/2Lk4AHX
वृत्तसंस्था, लंडन सुंदर दिसण्यासाठी प्रत्येक स्त्री सौंदर्यप्रसाधने वापरते. या सौंदर्यप्रसाधनांनी तिचे सौंदर्य आणखी खुलते. त्यामुळे काही महिलांचा दररोज मोठ्या प्रमाणावर ही सौंदर्यप्रसाधने वापरण्याकडे कल असतो. मात्र, या सौंदर्यप्रसाधनांमध्ये अत्यंत घातक रसायने असल्याचे अलीकडेच झालेल्या एका अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. ‘अप्लाइड मायक्रोबायोलॉजी’ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या संशोधनामधून काही अत्यंत धक्कादायक गोष्टी प्रकाशझोतात आल्या आहेत. या संशोधनानुसार, ठराविक काळानंतर महिला चेहऱ्यावर लावलेली सौंदर्यप्रसाधने पुसत नाहीत तसेच, अनेक सौंदर्यप्रसाधने कालबाह्य झाल्यानंतरही वापरली जातात. त्यामुळे त्यांचा शरीरावर अत्यंत घातक परिणाम होण्याची शक्यता असते. दहा पैकी नऊ सौंदर्यप्रसाधने डोळ्यांच्या जवळ, तोंड किंवा जखमेवर लावली गेल्यास त्यातील विषाणूंमुळे त्वचेच्या आजारांपासून रक्तातील विषबाधेपर्यंत अनेक घातक परिणाम होत असल्याचे सिद्ध झाले आहे. तसेच, कमी रोगप्रतिकार शक्ती असलेल्या महिलांसाठी हा धोका आणखी वाढतो. त्यांना या सौंदर्यप्रसाधनांतून संसर्ग होण्याची शक्यता दुपटीने जास्ती असते, असे शास्त्रज्ञांनी सांगितले. जेव्हा सौंदर्यप्रसाधने, विशेषत: दोन सौंदर्यप्रसाधने एकत्र करून वापरण्याचा विचार केला जातो त्यावेळी ई-कोलीसारख्या विषाणूंमुळे संसर्ग होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे ठराविक काळानंतर ही सौंदर्यप्रसाधने चेहऱ्यावरून पुसून टाकणे आणि कालबाह्य झाल्यानंतर न वापरणे यासाठी महिलांना साक्षर करणे गरजेचे आहे, असे संशोधक अमरीन बशीर यांनी सांगितले आहे.