गवळीच्या मुलीचा या अभिनेत्याशी साखरपुडा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, December 24, 2019

गवळीच्या मुलीचा या अभिनेत्याशी साखरपुडा

https://ift.tt/2rsE7Bm
पुणे: गँगस्टर व माजी आमदार अरुण गवळीच्या लेकीचा साखरपुडा नुकताच पार पडला. योगिता गवळी हीचा साखरपुडा अभिनेता याच्यासोबत पुण्यातील एका हॉटेलमध्ये जवळचे नातेवाईक, मित्रपरिवार आणि आप्तेष्टांच्या उपस्थितीत पार पडला.अभिनेता क्षितीज दाते, मुग्धा परांजपे, विभावरी देशपांडे आणि हृषिकेश देशपांडे या कलाकारांनी या समारंभाला हजेरी लावली. अक्षय आणि योगिता हे गेल्या पाचवर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. 'पुणे टाइम्स'सोबत बोलताना अक्षय वाघमारे यानं सांगितलं की, 'मी आणि येगिता गेली पाच वर्षे एकमेकांना ओळखतो. आमच्यात मैत्री होती. आमची मैत्री कुटुंबीयांनाही माहिती होती. त्यामुळं घरच्यांनीच लग्न करण्याचा सल्ला दिला. या सल्ल्यानंतर आम्ही एकमेकांसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानं दोघंही आनंदी आहोत'. अक्षय बेधडक, दोस्तीगिरी, बस स्टॉप अशा अनेक मराठी चित्रपटात काम केलं आहे. तसंच नुकताच प्रदर्शित झालेला 'फत्तेशिकस्त' या चित्रपटांतही अक्षयनं महत्त्वाची भूमिका साकारली होती. अक्षय सरदार कोयाजी नाईक बांदल यांच्या भूमिकेत दिसला होता. वाचा: महिलांच्या आरोग्यासाठी काम करणाऱ्या एका सामाजिक संस्थेसाठी योगिता काम करते. तर काही चित्रपटांची निर्मिती देखील तिनं केली आहे. अरूण गवळी यांच्यावर २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या अंकुश चौधरीच्या ‘दगडी चाळ’ चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या ‘दगडी चाळ २’ या चित्रपटाची सहनिर्मितीची धुरा योगितानं सांभाळली आहे. दरम्यान, अक्षय आणि योगिता हे दोघे फेब्रुवारी २०२० मध्ये विवाह बंधनात अडकणार आहेत.