
ओटावा (कॅनडा): कॅनडाचे हे अंटार्क्टिका ओशन मॅरेथॉनमध्ये भाग घेणारे सर्वात वयोवृद्ध धावपटू ठरले आहेत. जॉर्गेन यांचे आजचे वय ८४ वर्षे इतके आहे. जॉर्गेन यांनी १३ डिसेंबर या दिवशी आपल्या मॅरेथॉन शर्यतीची सुरुवात केली होती. ही शर्यत त्यांनी ११ तास ४१ मिनिटांत पूर्ण केली. जॉर्गेन हे एक निवृत्त ऑइल वर्कर आहेत. त्यांनी सन १९६४ पासून विविध स्तरांवरील शर्यतींमध्ये भाग घेतला आहे. अंटार्क्टिका मॅरेथॉनमध्ये धावण्यासाठी जॉर्गेन यांनी तब्बल एक वर्ष सराव केला. अंटार्क्टिक मॅरेथॉन ही जगातील सर्वात कठीण मॅरेथॉन मानली जाते. या मॅरेथॉनमध्ये भाग घेण्यासाठी स्पर्धकांना १९ हजार डॉलर्स इतका खर्च येतो. या रकमेचा वापर करत स्पर्धकांना चिलीहून अंटार्क्टिका येथे नेले जाते. त्यानंतर तिथे स्पर्धकांना तंबूच्या घरांमध्ये ठेवले जाते. शिवाय त्यांना खाणेपिणेही पुरवले जाते. या सोबतच या सर्व स्पर्धकांना व्यवसायिक फोटोग्राफर देखील पुरवले जातात.