'बलात्कार थांबवा'! मल्लिका शेरावत संतापली - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, December 5, 2019

'बलात्कार थांबवा'! मल्लिका शेरावत संतापली

https://ift.tt/2sF4WCm
मुंबई: हैदराबादमध्ये डॉक्टर महिलेवर बलात्कार केल्यानंतर तिची जाळून हत्या केल्याच्या घटनेमुळं संपूर्ण देश हादरला असून, प्रचंड संताप व्यक्त होत आहे. बॉलिवूडमधील कलाकारदेखील याविषयी व्यक्त होत आहेत. अभिनेत्री हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून बलात्कार थांबलेच पाहिजेत असं लिहून एक पोस्ट शेअर केली आहे. चित्रपटसृष्टीपासून दूर असलेली अभिनेत्री मल्लिका शेरावत सोशल मीडियावर मात्र प्रचंड अॅक्टिव्ह असते. त्यामुळे तिनं इन्स्टाग्रामवर 'स्टॉप रेप' असं लाल भडक अक्षरात लिहून स्वत:चा एक फोटोही शेअर केला आहे. 'देशात होणारे बलात्काराचे हे सत्र थांबले पाहिजे, बलात्कार होणं थांबले पाहिजे' असं म्हणत तिनं हैदराबादमधील पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळावा अशी आशा व्यक्त केली आहे. >> हैदराबादमध्ये घडलं काय? २७ वर्षीय महिला डॉक्टरचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह रंगा रेड्डी जिल्ह्यातील शादनगर परिसरातील चतनपल्ली पुलाखाली सापडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालक आणि क्लीनरला ताब्यात घेतलं आहे. हे दोघेही आंध्र प्रदेशातील अनंतपूर येथील रहिवासी आहेत. त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी साधारण सहा वाजता दूधविक्रेते एस. सत्यम यांना हैदराबाद-बेंगळुरू मार्गावरील उड्डाणपुलाखाली जळालेल्या अवस्थेत मृतदेह दिसला. त्यांनी तात्काळ याबाबत गावातील व्यक्तींना कळवलं. त्यांनी स्थानिक पोलिसांना माहिती दिली. यानंतर सायबराबाद पोलिसांनी बेपत्ता व्यक्तींबाबत माहिती घेतली. बुधवारी रात्री शमशाबाद पोलिसांत एक डॉक्टर महिला बेपत्ता असल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यांच्या कुटुंबीयांना याबाबत कळवल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले. स्कार्फ आणि लॉकेटवरून त्यांनी मृतदेहाची ओळख पटवली. मृत महिलेची दुचाकी कोथूर येथे सापडली. मात्र, पर्स आणि मोबाइल फोन सापडला नाही, अशी माहिती पोलीस आयुक्त व्ही. सी. सज्जनार यांनी दिली. >> सोशल मीडियावर मागितला न्याय हैदराबादमधील या घटनेनं महिला आणि तरुणींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. डॉक्टर महिलेचा मृतदेह सापडल्यानंतर शहरात एकच खळबळ माजली. त्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी मृत डॉक्टर महिलेला श्रद्धांजली वाहिली आणि तिला न्याय दिला जावा, अशी मागणी केली आहे. आरोपींना कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणीही सोशल मीडियावर होत आहे.