'या'साठी प्रत्येकाने 'पानिपत' पाहावाच: राज - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, December 5, 2019

'या'साठी प्रत्येकाने 'पानिपत' पाहावाच: राज

https://ift.tt/2LjCTz1
मुंबई: दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचा बहुप्रतिक्षित सिनेमा 'पानिपत' येत्या शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पानिपत सिनेमाचं प्रदर्शनापूर्वीच कौतुक केलं आहे. पानिपतच्या लढाईकडे कसं पाहायला हवं याबाबतचं ट्विट त्यांनी केलं आहे. मऱ्हाठेशाहीच्या शौर्याचा इतिहास म्हणून या कडे पाहावं आणि त्यासाठी पानिपत सिनेमा पाहायला हवा, अशी पोस्ट ठाकरे यांनी केली आहे. या ट्विटमध्ये राज लिहितात, 'पानिपतची लढाई ही मऱ्हाटेशाहीनी हरलेली लढाई म्हणून न पाहता तो राजकीय आणि सांस्कृतिक आक्रमकांना थोपावणाऱ्या मरहट्ट्यांच्या शौर्याचा आविष्कार होता. मनगटात प्रचंड बळ असलेली अन् अटेकपार झेंडा नेणारी मऱ्हाठेशाही कुठे आणि का कमी पडली? हे पाहण्यासाठी पानिपतच्या लढाईकडे पहावंच लागेल. त्यासाठीचा उपलब्ध होत असलेला ध्वनिचित्र दस्तावेज म्हणजे माझे मित्र आशुतोष गोवारीकर यांचा ‘पानिपत’ चित्रपट. प्रत्येक मराठी माणसानेच नव्हे तर तमाम हिंदुस्थानीयांनीदेखील पहायला हवा.' हे ट्विट त्यांनी आशुतोष गोवारीकर यांना टॅगही केले आहे. यापूर्वी 'पानिपत' सिनेमाचे ट्रेलर पाहूनही राज यांनी या सिनेमाचे कौतुक केले होते.