कटक: वेस्ट इंडिजविरुद्धच्या (india vs west indies) अखेरच्या आणि निर्णायक सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवत मालिका खिशात घातली. अखेरच्या सामन्यात रोहित शर्माने () सामनावीर पुरस्कार पटकावला. या मालिकेत रोहितने पहिल्या सामन्यात १५९ धावा केल्या होत्या. तर अखेरच्या सामन्यात श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याचा २२ वर्ष जुना विक्रम त्याने मोडला. इतक नव्हे तर एका वर्षात सर्वाधिक धावा करण्याचा पराक्रम देखील रोहितने केला आहे. २०१९ या वर्षाचा विचार केल्यास रोहितची कामगिरी शानदार अशीच ठरली. २०१९मध्ये वनडेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज, सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज, सलामीवीर म्हणून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज, असे अनेक विक्रम या वर्षभरात त्याने स्वत:च्या नावावर केले. असे असेल तरी रोहितला एका गोष्टीचे दु:ख आहे. वाचा- खेळाडूला संघासाठी सर्वोत्तम कामगिरी करता येणे यासारखे समाधन कोणतेच नसले. पण अनेक वेळा सर्वोत्तम कामगिरी केल्यानंतर ही यश मिळत नाही. असच या वर्षात रोहित सोबत झाले आणि त्याच गोष्टीचे दु:ख त्याला आहे. ते दु:ख म्हणजे वर्ल्ड कप गमवण्याचे. रोहितने वर्ल्ड कपमध्ये पाच शतकी खेळी केल्या. पण भारतीय संघाला वर्ल्ड कप जिंकता आला नाही. वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका जिंकल्यानंतर रोहित म्हणाला, हा निर्णायक सामना होता आणि आम्हाला तो जिंकायचा होता. कटकची खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली होती. या सामन्यात मी आणखी काही वेळ फलंदाजी करायला हवी होती. अर्थात हे वर्ष माझ्यासाठी चांगले गेले. पण जर वर्ल्ड कप जिंकला असता तर खुप चांगले झाले असते. वाचा- अखेरच्या सामन्यात विराटने देखील चांगली कामगिरी केली. जडेजाचे योगदान देखील अत्यंत महत्त्वाचे होते. शार्दुलने सामन्याला विजयाच्या दिशेने नेले. त्याच्या फलंदाजीला तर तोडच नाही. संघात जलद गोलंदाज असणे ही चांगली बाब आहे. आगामी वर्ल्ड कप जिंकण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे तो म्हणाला. प्रत्येक सामन्याची रणनिती जाणून घेणे महत्त्वाचे असते. तुम्ही जेव्हा त्यानुसार काम करता तेव्हा सामना जिंकण्याच्या दृष्टीने तुमचा प्रवास सुरु होतो. अशा वेळी एकादा खेळाडू कशी किती चांगली कामगिरी करतो हे महत्त्वाचे ठरत नसल्याचे रोहितने सांगितले.