मी पाहिलेले उद्धव ठाकरे 'हे' नाहीत: फडणवीस - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, December 23, 2019

मी पाहिलेले उद्धव ठाकरे 'हे' नाहीत: फडणवीस

https://ift.tt/2Mii9rO
कोल्हापूर: शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याचा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना शब्द दिला होता, असं मुख्यमंत्री सांगत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जीवावर राज्यात सत्ता आणेल, असा शब्द उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांना दिला होता का? असा शब्द बाळासाहेबांना दिला असता तर त्यांनी हा शब्द खपवून घेतला नसता, असं सांगतानाच मी पाहिलेले उद्धव ठाकरे हे नाहीत, असा टोला विरोधी पक्षनेते यांनी हाणला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित सम्राट महाडिक आणि राहुल महाडिक यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी केलेली ही केवळ औपचारिकता असून या कर्जमाफीने शेतकऱ्यांचा काहीही फायदा होणार नाही. ज्यांना गरज आहे, त्यांना तर या कर्जमाफीचा अजिबात फायदा होणार नाही, असं सांगतानाच विश्वासघाताने सत्तेवर आलेल्या या सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

शेतकऱ्यांचं दीड लाखांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला होता. या सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं. सातबारा सोडा या सरकारने केवळ पीक कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला असून सरसकट कर्जमाफीच्या मुद्द्याला पाने पुसली आहेत. अतिवृष्टीमुळे पीडित झालेल्या शेतकऱ्यांना प्रत्येकी २५ हजार रुपये भरपाई देण्याचं आश्वासनही दिलं होतं. ही आश्वासनं फडणवीस सरकारने पूर्ण करावीत, असा टोलाही फडणवीस यांनी हाणला. यावेळी त्यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून अफवा पसरविल्या जात असल्याने त्यापासून सावध राहण्याचे आवाहनही त्यांनी केलं. CAAवरून ज्या अफवा पसरवल्या जात आहेत त्यांचा निषेध करत कोणत्याच नागरिकाची नागरिकता परत घेण्याची तरतूद या कायद्यात नाही. हा नागरिकत्व देणारा कायदा आहे, नागरिकत्व काढून घेणारा कायदा नव्हे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.