धोनी कॅप्टन कुल नव्हे तर सर्वात 'डोकेबाज' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, December 15, 2019

धोनी कॅप्टन कुल नव्हे तर सर्वात 'डोकेबाज'

https://ift.tt/2Ek7Y1A
नवी दिल्ली: भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी गेल्या काही महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर आहे. धोनी मैदानात दिसत नसला तरी त्याच्या चाहत्यांची संख्या काही कमी झालेली नाही. केवळ सामान्य क्रिकेट चाहतेच नव्हे तर अनेक दिग्गज आजी-माजी क्रिकेटपटू देखील धोनीचे चाहते आहेत. अनेक वेळा त्यांनी धोनीचे कौतुक केले आहे. कॅप्टन कुल अशी प्रतिमा असलेल्या धोनीला आता आणखी एक नाव मिळाले आहे. सध्या वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर आहे. दोन्ही संघादरम्यान आजपासून एकदिवसीय क्रिकेट मालिकेला सुरुवात होत आहे. वेस्ट इंडिजचा कर्णधार कायरन पोलार्ड हा देखील धोनीचा फॅन आहे. वनडे मालिकेआधी एका प्रश्नाला उत्तर देताना पोलार्डने सांगितले की, धोनी हा सर्वात स्मार्ट क्रिकेटपटू आहे. एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत त्याला सर्वात स्मार्ट क्रिकेटपटू कोण असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर पोलार्डने धोनीकडे स्मार्ट क्रिकेट ब्रेन असल्याचे सांगितले. त्यानंतर जर कोणाचे नाव घ्याचे झाले तर श्रीलंकेचा महेला जयवर्धने याचा उल्लेख करावा लागेल असे तो म्हणाला. धोनीने इंग्लंडमध्ये झालेल्या क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्ध अखेरचा सामना खेळला होता. त्यानंतर धोनी अद्याप मैदानावर दिसला नाही. या काळात तो निवृत्त होणार असल्याची चर्चा सुरु होती. पण खुद्द धोनीने निवृत्ती संदर्भात अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही. पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये धोनी खेळणार का यासंदर्भात देखील चर्चा सुरु आहेत.

टीम इंडिया सर्वात आवडता संघ अन्य एका प्रश्नाला उत्तर देताना पोलार्डने वेस्ट इंडिजनंतर भारतीय संघ सर्वात आवडतो असे उत्तर दिले. त्याच बरोबर टी-२० जर कोणी द्विशतक करू शकते तर तो ख्रिस गेलच असेल असे पोलार्ड म्हणाला. धोनी टी-२० वर्ल्ड कप खेळणार; कारण... धोनी टीम इंडियाकडून खेळणार या यासंदर्भात आता चेन्नई सुपर किंग्जमधील एका सहकाऱ्याने शनिवारी मोठा खुलासा केला होता. धोनीचा आयपीएलमधील सहकारी आणि वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू ड्वेन ब्राव्हो (Dwayne Bravo) याने धोनीच्या पुढील करिअरमधील वक्तव्य केले. धोनीने अद्याप क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली नाही. मला वाटते की तो पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये खेळेल. धोनीने क्रिकेटच्या बाहेरील गोष्टीचा कधीच स्वत:वर परिणाम होऊ दिला नाही. कोणत्याही परिस्थितीला न घाबरता, स्वत:च्या क्षमतांवर विश्वास ठेवावे हेच त्याने आम्हाला शिकवले आहे. तो पुढील वर्षी होणारा टी-२० वर्ल्ड कप खेळेल याबाबत मला कोणतही शंका नाही, असे ब्राव्होने सांगितले.