कराची: पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू (Danish Kaneria) याला हिंदू असल्यामुळे देण्यात आलेल्या वागणूकीसंदर्भात आता माजी कर्णधार इंझमाम उल-हकने () स्पष्टकरण दिले आहे. यासंदर्भात इंझमामने माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने केलेले वक्तव्य खोट असल्याचे थेट म्हटले नाही. पण दानिश सोबत संघातील खेळाडूंनी असा प्रकारचा व्यवहार केला नसल्याचे सांगितले. पाकिस्तानकडून खेळताना दानिश सर्वाधिक काळ माझ्या नेतृत्वाखाली खेळला आहे आणि मला वाटत नाही की संघातील खेळाडूंनी कधी त्याच्या सोबत असा व्यवहार केला असेल. तो गैर मुस्लिम आहे म्हणून त्याच्यासोबत कोणी चुकीचे वागले नाही. दानिश हिंदू होता म्हणून त्याच्या सोबत कोणी जेवत नव्हते, असा गौप्यस्फोट माजी क्रिकेटपटू () याने केला होता. त्यावर इंझमामने हे स्पष्टीकरण दिले आहे. शोएबने केलेल्या गौप्यस्फोटानंतर दानिशने देखील संघातील काही खेळाडू मला वेगळ पाडत असल्याचे सांगितले होते. पाकिस्तानी लोकांचे मन छोटे असते, असे दानिश म्हणाला होता. इंझमामने दानिशच्या या वाक्यावर आक्षेप घेतला. माझ्या मते पाकिस्तानी लोकांचे मन मोठे असते. आम्ही सर्वांना मोठ्या मनाने स्विकारतो. मुश्ताक अहमद माझा बालपणीचा मित्र होता. पण मी संघात दानिशला संधी दिली. कारण तो पाकिस्तानचे भविष्य होता. माझ्या कर्णधारपदाच्या काळातच मुश्ताकला संघातून ड्रॉप करण्यात आले होते. नमाज पढल्यानंतरच संघात संधी दिली जात होती, हे साफ चुकीचे असल्याचे इंझमाम म्हणाला. वाचा- युसुफ पाकिस्तान संघात सदस्य होता. तो गैर मुस्लिम होता. पण नंतर त्याने स्वत:हून इस्लाम धर्म स्विकारला. त्याने देखील धर्म बदलण्याआधी संघात अशा प्रकारचे वातावरण पाहिले नसल्याचे इंझमामने सांगितले. भारताचा संघ २००४मध्ये १५ वर्षानंतर पाकिस्तानच्या दौऱ्यावर आला होता. तेव्हा पाकमधील लोकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले होते. भारतीय क्रिकेटपटूंकडून जेवणाचे, शॉपिंगचे किंवा टॅक्सीचे पैसे घेतले नाहीत. जेव्हा एका वर्षानंतर पाकिस्तानचा संघ भारत दौऱ्यावर गेला तेव्हा आम्हाला देखील असाच अनुभव आल्याचे इंझमाम म्हणाला. वाचा- विक्राची नोंद २००५मध्ये भारत दौऱ्याआधी मी एका शूटिंगसाठी कोलकातामध्ये गेले होतो. पाकिस्तानकडून मी आणि भारताकडून सौरव गांगुली होता. तेव्हा गांगुलीने एक हॉटेल सुरु केले होते. त्याचे उद्घाटन सचिन आणि माझ्या हस्ते झाले होते. सौरव दोन्ही वेळेसाठी स्वत: त्याच्या हॉटेलमधून जेवण पाठवत होता, अशी आठवण इंझमामने सांगितली. शारजाहमध्ये दोन्ही संघाचे खेळाडू एकत्र बसून जेवायचे. इतक नव्हे तर एकमेकांच्या रुमध्ये अनेक वेळा गप्पा मारल्या जात असत, असे ही तो म्हणाला.