'या' कंपनीत सिगारेट न पिणाऱ्यांना ६ दिवस सुट्टी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, December 3, 2019

'या' कंपनीत सिगारेट न पिणाऱ्यांना ६ दिवस सुट्टी

https://ift.tt/2rSgiT2
नवी दिल्ली: कार्यालयीन वेळेत सिगारेट पिण्यासाठी 'ब्रेक' घेणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळं कामावर परिणाम होत असल्यानं जपानमधील 'पियाला' () या कंपनीनं अनोखी शक्कल लढवली आहे. कामाच्या वेळेत न घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहा दिवसांची अतिरिक्त सुट्टी देण्याची योजना कंपनीनं तयार केली आहे. 'सिगारेट ब्रेक'मुळं काम आणि उत्पादकतेवर परिणाम होतो, अशी तक्रार एका कर्मचाऱ्यानं केली होती. त्याची दखल घेत कंपनीनं हे धोरण अवलंबलं आहे. कार्यालयीन कामकाजादरम्यान जे सिगारेट पिण्यासाठी ब्रेक घेतात, त्यांच्यामुळं एकूण काम आणि कंपनीच्या उत्पादन क्षमतेवर परिणाम होतो, अशी तक्रार पियाला या कंपनीतील एका कर्मचाऱ्यानं केली. त्याची गंभीर दखल कंपनी व्यवस्थापनानं घेतली. त्यानंतर सिगारेट ब्रेक न घेणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कंपनीनं एक अनोखी योजना राबवली आहे. सिगारेट ब्रेक न घेतल्यास त्या कर्मचाऱ्यांना सहा दिवस अतिरिक्त सुट्टी दिली जात आहे. रिपोर्ट्सनुसार, टोकिओमधील या कंपनीचं कार्यालय एका इमारतीच्या २९व्या मजल्यावर आहे. कर्मचाऱ्यांना सिगारेट पिण्यासाठी बेसमेंटमध्ये जावं लागतं. हा ब्रेक सर्वसाधारणपणे १५ मिनिटांचा असतो. पण ज्या कर्मचाऱ्यांना सिगारेटचं व्यसन नव्हतं अशा कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी होती. त्यांनी याबाबत कंपनीचे सीईओ ताकाओ असुका यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी सिगारेट न पिणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोबदला म्हणून सहा दिवसांची अतिरिक्त सुट्टी देण्याचा निर्णय घेतला. धुम्रपान करण्यापासून रोखण्यासाठी कर्मचाऱ्यांवर दबाव किंवा त्यांना दंड करण्याऐवजी हे व्यसन कसं सोडवता येईल यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. अशा प्रकारे प्रोत्साहन दिल्यास चांगले परिणाम दिसून येतील, असं असुका यांनी सांगितलं.