काश्मीरमध्ये हिमस्खलन, अनेक जवान बेपत्ता - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, December 4, 2019

काश्मीरमध्ये हिमस्खलन, अनेक जवान बेपत्ता

https://ift.tt/361J4j7
श्रीनगर: उत्तर काश्मीरमधील अनेक भागांमध्ये झालेल्या हिमस्खलनात अनेक जवान बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे. काश्मीरमधील आणि जिल्ह्यांमधील अनेक भागात मोठे झाले आहे. एआरटी बेपत्ता जवानांना शोध घेत आहे. हिमस्खलनाबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बांदीपोराच्या गुरेज सेक्टरमध्ये, तसेच कुपवाडा जिल्ह्यातील करनाह सेक्टरमध्ये या हिमस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. हे दोन्ही भाग उत्तर काश्मीरमध्ये येतात. १८ हजार फूटपेक्षा अधिक उंचीवर झालेल्या या हिमस्खलनात एकूण ४ जवान बेपत्ता झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. बेपत्ता जवानांच्या बचावकार्यासाठी लष्कराने हिमस्खलन बचाव पथक आणि लष्करी हेलिकॉप्टर्सची मदत घेतली आहे. तथापि, या शोधमोहिमेबाबत लष्कराने कोणतीही माहिती दिलेली नाही. दरम्यान, सियाचिन ग्लेशियरमध्ये झालेल्या विविध हिमस्खलनाच्या घटनांनमध्ये अनेक जवानांना आपला जीव गमवावा लागला आहे. सियाचिन ही जगातील सर्वात उंचीवर असलेली युद्धभूमी मानली जाते. तीन दिवसांपूर्वी सियाचीनच्या दक्षिण भागात झालेल्या हिमस्खलनात लष्कराचे दोन जवान शहीद झाले होते. या पूर्वी १८ नोव्हेंबरला देखील सियाचीन ग्लेशियरमध्ये झालेल्या भीषण हिमस्खलनात भारतीय लष्कराचे ४ जवान शहीद झाले होते. या व्यतिरिक्त दोघा पोर्टर्सचा देखील मृत्यू झाला होता. १९८४ पासून आतापर्यंत १००० हून अधिक जवान शहीद सियाचीनमध्ये यापूर्वी अनेकवेळा अशा घटनांमध्ये शेकडो भारतीय जवानांना आपला जीव गमवावा लागला आहे. याबाबतच्या आकडेवारीनुसार, सन १९८४ मध्ये आतापर्यंत हिमस्खलनाच्या घटनांमध्ये लष्कराच्या ३५ अधिकाऱ्यांसह १००० हून अधिक जवान सियाचीनमध्ये शहीद झाले आहेत. सन २०१६ मध्ये अशाच एका घटनेत मद्रास रेजिमेंटचे जवान हनुमनथप्पा यांच्याह एकूण १० जवान शहीद झाले होते. हिवाळ्यात होते उणे ६० डीग्री इतके तापमान कामकोम क्षेत्रात सुमारे २० हजार फूट उंचीवर असलेल्या सियाचीन ग्लेशियर हे जगातील सर्वात उंच लष्करी क्षेत्र मानले जाते. इथे जवानांचे शरीर थंडीने सुन्न होऊन जाते. शिवाय इथे थंड वारेही वाहत असतात. ग्लेशियरमध्ये हिवाळ्यात हिमस्खलन होणे ही सामान्यबाब मानली जाते. या बरोबरच हिवाळ्यात इथले तापमान उणे ६० डिग्री सेल्शियसपर्यंत पोहोचते.