शेअर्समध्ये तेजी; सेन्सेक्सची ३०० अंकांची दौड - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, December 13, 2019

शेअर्समध्ये तेजी; सेन्सेक्सची ३०० अंकांची दौड

https://ift.tt/36wg2bs
मुंबई : मागील दीड वर्षांपासून सुरु असलेल्या निघण्याच्या शक्यतेने अमेरिका आणि आशियातील शेअर बाजारांमध्ये तेजी दिसून आली. सकाळच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने ३०० अंकांची वाढ झाली असून सध्या तो ४० हजार ९०० अंकांपर्यंत पोहचला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८५ अंकांच्या वाढीसह १२ हजार ५७ अंकांवर व्यवहार करत आहे. आशियातील बहुतांश बाजारांमध्ये तेजी आहे. ज्यात जपानच्या निक्केई निर्देशांकात दोन टक्क्याची वाढ झाली आहे. सिंगापूरमधील शेअर बाजार ३२ अंकांच्या वाढीसह खुला झाला. अमेरिका आणि चीनमधील व्यापारी युद्धावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही देशांनी हालचाली सुरु केल्या आहेत. ब्रिटनमध्ये निवडणूक होत असून यात कन्झर्व्हेटीव्ह पार्टी जिंकेल असे अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे जागतिक गुंतवणूकदार भांडवली बाजारात सक्रिय झाले आहेत. ही तेजी आणखी वाढण्याचा अंदाज शेअर बाजार विश्लेषक व्यक्त करत आहेत. गुरुवारी भारतीय बाजारांमध्ये परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ६८३ कोटींचे शेअर्स विक्री केले. मेटल, ऑटो, एनर्जी , इन्फ्रा या क्षेत्रात सध्या खरेदीचा ट्रेंड आहे. निफ्टीमधील ५० पैकी ३२ शेअर तेजीत असून १८ शेअर घसरले आहेत. हे शेअर तेजीत अरविंद, आयडीबीआय, ओरिएंटल बँक, शिपिंग कोर्पोरेश, कॉरपोर्रेशन बँक,युको बँक, टाटा मोटर्स, रिलायन्स पॉवर, रिलायन्स इन्फ्रा, अशोक लेलँड, मॅग्मा फिनकॉर्प यासारखे शेअर तेजीत आहेत. या शेअरमध्ये झाली घसरण डॉ. रेड्डी लॅब, जैन इरिगेशन, भारती इन्फ्रा, हॉस्पिटल, उज्जीवन फायनान्शियल, ग्लेनमार्क फार्मा सारखे शेअरवर विक्रीचा दबाव दिसून आला.