
मुंबई: विश्वासदर्शक ठराव मोठ्या संख्याबळाने मंजूर झाल्याने आज, रविवारी होणाऱ्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील चुरस तशी पाहता संपली आहे. पण शनिवारी विधीमंडळात विरोधकांनी केलेल्या गदारोळानंतर आज रविवारीही अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या वेळी नेमकं काय होतं हे पाहणं औत्सुक्याचं आहे. सत्तारूढ महाविकास आघाडीकडून अध्यक्षपदासाठी नाना पटोले तर, भाजपकडून किसन कथोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. पाहा या निवडणुकीसंबंधीचे लाइव्ह अपडेट्स: लाइव्ह अपडेट्स: > अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होईल यासाठी प्रयत्न > अजित पवार, छगन भुजबळ हे राष्ट्रवादीचे नेते विधानभवनात पोहोचले > अध्यक्षपदासाठी आज ११ वाजता मतदान