
पुणे: यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. लागू यांच्या पार्थिवावर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. सध्या डॉ. लागू यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी बालगंधर्व रंगमंदिर येथे सकाळी १० ते ११ या वेळेत ठेवण्यात आले आहे. नाट्य, चित्रपटसृष्टीतील मान्यवरांसह डॉ. लागू यांच्या चाहत्यांनी गर्दी केली आहे. लाइव्ह अपडेट्स: >> ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी डॉ. लागू यांच्या पार्थिवाचे घेतले दर्शन >> डॉ. लागू यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी बालगंधर्व रंगमंदिर येथे कलाकार, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांची गर्दी>> डॉ. लागू यांचे शोकाकुल कुटुंबीय आणि अभिनेते नंदू माधव >> डॉ. श्रीराम लागू यांच्या अंत्यदर्शनासाठी बालगंधर्व रंगमंदिर येथे चाहत्यांची गर्दी>> डॉ. श्रीराम लागू यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार