२०२० मध्ये देशात ६ नवीन AIIMS सुरू होणार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, January 2, 2020

२०२० मध्ये देशात ६ नवीन AIIMS सुरू होणार

https://ift.tt/39qjO8N
नवी दिल्लीः नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. २०२० मध्ये आणखी सहा सुरू होणार आहेत. या सहा AIIMS पैकी दोन उत्तर प्रदेश, एक पश्चिम बंगाल, एक महाराष्ट्र तर एक आंध्र प्रदेश राज्यात बनवण्यात येणार आहेत. उत्तर प्रदेशातील रायबरेली व गोरखपूर या दोन ठिकाणी बनवण्यात येणार आहे. त्याचे काम सुरू आहे. आंध्र प्रदेशातील मंगलगिरीत तर महाराष्ट्रातील नागपूरमध्ये हे बनवण्यात येणार आहे. पश्चिम बंगालमधील कल्याणी, व पंजाबमधील बठिंडामध्ये यावर्षी AIIMS तयार होतील असे सांगितले जात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, वर्ष २०२० मध्ये सर्वात आधी पहिले एम्स उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये सुरू करण्यात येईल. या एम्ससाठी जवळपास १०११ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. एप्रिलमध्ये गोरखपूर कार्यरत होईल. गोरखपूर हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मतदारसंघ आहे. जूनमध्ये रायबरेली व बठिंडामध्ये एम्स सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या आठवड्यात बठिंडा एम्समध्ये ११ प्रकारची ओपीडी सुविधा आणि जनरल शस्त्रक्रिया सुविधा करण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या अहवालानुसार, या सहा एम्सपैकी सर्वात महागडा एम्स पश्चिम बंगालमधील कल्याणीमध्ये तयार केला जात आहे. यासाठी १७५४ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. हे एम्स यावर्षीच्या ऑक्टोबरमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, १६१८ कोटी रुपयांचा खर्च असलेला एम्स मंगलगिरी आणि नागपूरमधील एम्सवर १५७७ कोटी रुपये खर्चे करण्यात येणार आहेत. नागपूरमधील एम्स ऑक्टोबर महिन्यात सुरू करण्यात येईल, असे सांगितले. सध्या देशभरात दिल्ली, रायपूर, पाटणा, जोधपूर, भोपाळ, ऋषिकेश आणि भुवनेशवरमध्ये एम्स आहेत. त्यामुळे या नव्या सहा एम्समुळे देशभरातील AIIMS ची संख्या १२ वर पोहोचणार आहे.