दिल्ली हिंसाचारात बाहेरच्या लोकांचा हातः SIT - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, January 2, 2020

दिल्ली हिंसाचारात बाहेरच्या लोकांचा हातः SIT

https://ift.tt/2ZIoYbx
नवी दिल्लीः केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कायद्याला विरोध करण्यासाठी दिल्लीत जे हिंसक आंदोलन करण्यात आले होते त्या हिंसाचारात बाहेरचे लोक सहभागी होते, असा निष्कर्ष विशेष तपास पथकाने काढला आहे. डिसेंबर महिन्यात दिल्लीतील जामिया विद्यापीठात नागरिकत्व कायद्याला विरोध करण्यासाठी जे आंदोलन करण्यात आले होते. ते आंदोलन हिंसक झाले होते. तसेच यात १०० जण जखमी झाले होते. त्याचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने अहवाल सादर केला आहे. जामिया मिलिया इस्लामिया मध्ये झालेल्या हिंसक आंदोलन व दगडफेकीत ओखला आणि बाटला हाऊसजवळील लोक सहभागी होते. जामा मशीद ते दरियागंज पर्यंत पायी मोर्चा दरम्यान हिंसक आंदोलन करणाऱ्यात यमुनापारच्या सीलमपूर आणि मुस्तफाबादची लोकं सहभागी होती. नॉर्थ इस्ट जिल्ह्यातील सीलमपूर, मुस्तफाबाद आणि जाफराबादच्या तीन प्रकरणात गाझियाबादच्या लोनी आणि जुनी दिल्लीतील लोक सहभागी होती, अशी माहिती या तपास पथकाच्या अहवालातून समोर आली आहे. शाहदरा जिल्ह्यातील सीमापुरी परिसरात दगडफेक करणाऱ्यात गाझियाबादची लोक होती. शहीद नगरच्या अटक करण्यात आलेल्या ६४ पैकी १० लोक ही बाहेरची होती. या १० लोकांची ओळख पटवणे एसआयटीसमोर आव्हाण असणार आहे. या हिंसक आंदोलनात १०० जण जखमी झाले होते. खासगी चॅनेलकडून आंदोलनाचे फुटेज मागवून घेवू व त्यानंतर या लोकांचा शोध घेतला जाईल, असे एका एसआयटीच्या अधिकाऱ्याने सांगितले. मोबाइल व्हिडिओ बनवणाऱ्या लोकांनीही एसआयटीला सहकार्य करावे, असे आवाहन अधिकाऱ्याने केले आहे. जामियात जो हिंसाचार झाला त्या घटनेला ओखला व बाटला हाऊसमधील लोक जबाबदार आहेत. त्यांनीच या ठिकाणी येऊन दगडफेक केली व जाळपोळ केली. या हिंसाचारात १०० जण जखमी झाले होते. त्यापैकी ४० पोलीस कर्मचारी होते.