संविधानातून धर्मनिरपेक्ष शब्द वगळाः आरएसएस - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, January 4, 2020

संविधानातून धर्मनिरपेक्ष शब्द वगळाः आरएसएस

https://ift.tt/37Avq7q
नवी दिल्लीः राज्यघटनेच्या सरनाम्यातून ‘’ हा शब्द वगळण्यात यावा अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक प्रमुख नेते व संयोजक नंदकुमार यांनी केली आहे. धर्मनिरपेक्ष या शब्दावर केंद्र सरकारने पुनर्विचार करावा, कारण हा शब्द पाश्चिमात्यातून आला आहे, असे त्यांनी म्हटले आहे. आरएसएसच्या एका पदाधिकाऱ्याने लिहिलेल्या 'बदलत्या काळातील हिंदूत्व' या पुस्तकाच्या प्रकाशनात नंदकुमार यांनी ही मागणी केली. यावेळी आरएसएसचे ज्येष्ठ नेते कृष्ण गोपालही उपस्थित होते. भारतात धर्मनिरपेक्ष शब्दाची आवश्यकता नाही. धर्मनिरपेक्ष असण्याचा आम्हाला बोर्ड लावण्याची खरंच गरज आहे का?, हे पाहावे लागणार आहे. व्यवहार, कार्य आणि भूमिकेच्या माध्यमातून हे आम्हाला सिद्ध करावे लागणार आहे का?, असा सवालही त्यांनी यावेळी केली. नंदकुमार यांनी या कार्यक्रमात 'पश्चिम बंगालचे इस्लामीकरण' या पुस्तकातून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे. संविधानाच्या प्रस्तावनेत धर्मनिरपेक्ष शब्दाची आवश्यकता नाही आहे. तसेच संविधानाचे संस्थापकही याविरोधात होते, असा दावा त्यांनी यावेळी केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कृष्ण स्वामी अय्यर यांच्यासह संविधानाचे सर्व सदस्य या शब्दा विरोधात होते. त्यांनी धर्मनिरपेक्ष या शब्दाला संविधानाच्या प्रस्तावनेत समावेश करणे आवश्यक नाही, असे म्हटले होते. तरीही त्यांची मागणी त्या वेळी फेटाळण्यात आली व या शब्दाचा संविधानाच्या प्रस्तावनेत समावेश करण्यात आल्याचा दावा त्यांनी आपल्या भाषणात केला. १९७६ साली ज्यावेळी इंदिरा गांधी यांनी धर्मनिरपेक्ष शब्दावर जोर दिला. त्यावेळी आंबेडकरांचे मत स्वीकारण्यात आले नव्हते, असेही ते म्हणाले. संविधान दिन अवघ्या काही दिवसावर आलेला असाताना आरएसएसच्या नंदकुमार यांनी संविधान प्रस्तावनेतील धर्मनिरपेक्ष या शब्दावर आक्षेप घेतल्याने यावरून आता वाद उद्भवण्याची शक्यता आहे.