बगदादः अमेरिकेकडून पुन्हा हवाई हल्ला, ६ ठार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, January 4, 2020

बगदादः अमेरिकेकडून पुन्हा हवाई हल्ला, ६ ठार

https://ift.tt/37zKpOM
बगदादः अमेरिकेने इराकच्या बगदादमध्ये शनिवारी पुन्हा एक केला. उत्तरी बगदादमध्ये शनिवारी सकाळी करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेने शुक्रवारी केलेल्या हल्ल्यात जनरल कासिम सुलेमानी याच्यासह ८ जणांचा मृत्यू झाला होता. अमेरिकेने शनिवारी केलेल्या हल्ल्यात ६ जण ठार झाले असून ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. आज केलेल्या हवाई हल्ल्यात ईराण समर्थक मिलिशिया हश्द अल शाबी चा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हश्द अल शाबी हा ईराण समर्थक प्रसिद्ध मोबलाइजेशन फोर्सेसचे दुसरे नाव आहे. बगदादमध्ये करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात दोन वाहनांना लक्ष्य करण्यात आले. या वाहनातून प्रवास करणाऱ्या सहा जणांचा जळून मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात हश्द अल शाबीचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. परंतु, याला अद्याप दुजोरा मिळालेला नाही. याआधी अमेरिकेने शुक्रवारी मध्यरात्री इराकची राजधानी बगदादमध्ये हवाई हल्ला केला होता. या हल्ल्यात कुद्स फोर्सचा प्रमुख मेजर जनरल कासिम सुलेमानी चा मृत्यू झाला होता. सुलेमानीचा ताफा विमानतळाकडे जात असताना अमेरिकेने हवाई हल्ला केला. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. शनिवारी पुन्हा एकदा अमेरिकेने पॉप्युलर मोबलायझेशन फोर्सला लक्ष्य केले. याआधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते की, अमेरिका ईराणसोबत युद्ध करू इच्छित नाही. परंतु, जर इस्लामिक राष्ट्राने प्रत्युत्तर म्हणून काही कारवाई केली तर अमेरिका याला प्रत्युत्तर देण्यासाठी तयार आहे. ट्रम्पच्या या वक्तव्याला काही तास उलटत नाही तोच अमेरिकेने आज शनिवारी पुन्हा एकदा हवाई हल्ला केला.