बगदाद: रॉकेट हल्ल्यात मेजर जनरल सुलेमानी ठार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, January 3, 2020

बगदाद: रॉकेट हल्ल्यात मेजर जनरल सुलेमानी ठार

https://ift.tt/2FislwK
बगदाद: ईराणच्या कद्स फोर्सचा प्रमुख मेजर जनरल हा अमेरिकेने बगदादमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात मारला गेला आहे. सुलेमानी यांचा ताफा बगदाद विमानतळाकडे जात असताना अमेरिकेने हा हल्ला केला. या हल्ल्यात ईराणचे समर्थन असलेला पॉप्युलर मॉबिलायझेशन फोर्सचा डेप्युटी कमांडर अबू मेहदी अल मुहांदिस हा देखील मारला गेल्याचे वृत्त आहे. ईराणकडून सुलेमानी यांच्या मृत्यूला दुजोरा अमेरिकेच्या हल्ल्यात सुलेमानी मारला गेल्याच्या वृत्ताला ईराणच्या सरकारी टीव्हीने दुजोरा दिला आहे. सुलेमानी हा पश्चिम आशियात ईराणी कार्यक्रम राबवण्यारा प्रमुख रणनीतिकार मानला जातो. सीरियात आपली मुळे घट्ट करणे, तसेच इस्रायलमध्ये रॉकेट हल्ला करणे हे आरोप सुलेमानी यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. दीर्घ काळापासून सुलेमानीच्या मागावर होती. पेंटागॉनचा देखील वृत्ताला दुजोरा अमेरिकेच्या या हल्ल्यात सिलेमान मारला गेल्याच्या वृत्ताला पेंटागॉनने देखील दुजोरा दिला आहे. याबाबत अमेरिकी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर अमेरिकी सैन्याने ईराणचे वरिष्ठ कमांडर सुलेमानी यांना मारले आहे.

ट्रम्प यांचे मजकूर नसलेले ट्विट दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सुलेमानी ठार झाल्यानंतर अमेरिकेचा राष्ट्रध्वज ट्विट केला आहे. या ट्विटद्वारे ट्रम्प यांनी जगाला संदेश दिला असल्याचे बोलले जात आहे. कोणताही मजकूर नसलेल्या ट्विटमध्ये अमेरिकेचा राष्ट्रध्वज दिसत आहे. गेल्या वर्षापासून आणि अमेरिकेदरम्यान तणाव वाढला आहे. अमेरिकेने ईराणवर अनेक बंधनेही लादली आहेत. पश्चिम आशियात तणाव वाढण्याची शक्यता अमेरिकेच्या इराणमधील हल्ल्यानंतर पश्चिम आशियात तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त होऊ लागली आहे. मिलिशियाने बगदादमधील अमेरिकी दूतावासावर हल्ला केल्यानंतर अमेरिकेने आजचा हल्ला केला आहे. ईराणच्या कद्स फोर्सने कच्च्या तेलाच्या संदर्भात असद आणि त्याचा लेबनानी सहकारी हिजबुल्ला याचे समर्थन केल्याचा आरोप अमेरिकेच्या वित्त मंत्रालयाने केला होता.