इरफानचे बाबा म्हणायचे, 'ब्राह्मण जन्माला आला' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, January 7, 2020

इरफानचे बाबा म्हणायचे, 'ब्राह्मण जन्माला आला'

https://ift.tt/2FrT4XE
मुंबई- बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाची छाप सोडणारा अभिनेता प्रत्येक वयातील प्रेक्षकांना आपलासा वाटतो. आज इरफान त्याचा ५३ वा वाढदिवस साजरा करत आहे. १९६७ मध्ये जयपुर येथे एका मुस्लिम पठाण कुटुंबियात इरफानचा जन्म झाला. त्याचं पूर्ण नाव साहबजादे इरफान अली खान असं आहे. इरफानच्या वडिलांचा टायरचा व्यवसाय होता. फार कमी लोकांना माहीत आहे की, पठाण असूनही इरफान लहानपणापासून शाकाहारी आहे. यामुळे इरफानचे बाबा त्याला नेहमी पठाणच्या घरी ब्राह्मण जन्माला आला असंच म्हणायचे. इरफान खानचा आयुष्य जगण्याचा संघर्ष फार मोठा आहे. जेव्हा त्याला एनएसडीमध्ये प्रवेश मिळाला, त्याच दरम्यान इरफानचे बाबा गेले. यानंतर त्याला घरच्यांकडून पैसे मिळणं बंद झालं. एनएसडीकडून मिळणाऱ्या शिष्यवृत्तीवर त्याने कोर्स पूर्ण केला. इरफानने त्याची वर्गमैत्रीण सुतपा सिकंदरशी २३ फेब्रुवारी १९९५ मध्ये लग्न केलं. इरफानच्या अनेक वाईट दिवसांमध्ये सुतपा त्याच्या पाठीशी खंबीर उभी राहिली. इरफानने जेव्हा सुतपाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा तिच्यासाठी त्याने धर्म परिवर्तनाचीही तयारी दाखवली. पण त्याआधीच सुतपाच्या घरातल्यांनी लग्नासाठी मंजूरी दिली. यानंतर इरफानला धर्म बदलण्याची गरज पडली नाही. इरफान खानने त्याच्या करिअरमध्ये एकाहून एक सरस सिनेमे दिले. बॉलिवूडप्रमाणे तो हॉलिवूडमध्येही सक्रिय आहे. त्याने 'स्पाइडर मॅन', 'जुरासिक वर्ल्ड' आणि 'इन्फर्नो' या सिनेमांमध्ये काम केलं. एका मुलाखतीतहॉलिवूड अभिनेता टॉम हँक्सने इरफानचं कौतुक करत म्हटलं होतं की, 'इरफानचे डोळेही अभिनय करतात.' इरफानने २००५ मध्ये रोग या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. याशिवाय हासिल सिनेमासाठी इरफानला सर्वोत्कृष्ट खलनायकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. यानंतर इरफानने 'लंचबॉक्स', 'गुंडे', 'हैदर', 'पीकू' आणि 'हिंदी मीडियम'सारख्या सिनेमांमध्ये काम केलं. 'पान सिंह तोमर' सिनेमासाठी इरफानला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. २०११ मध्ये भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्काराने त्याला सन्मानित करण्यात आले. २०१८ मध्ये इरफानला एंडोक्राइन नावाचा एक आजार झाला. याच्या उपचारांसाठी तो लंडनला गेला होता. एक वर्ष उपचार घेतल्यानंतर तो भारतात परतला. इरफान आता पूर्णपणे बरा झाला असून त्याने हिंदी मीडियम २ सिनेमाच्या चित्रीकरणालाही सुरुवात केली आहे. या सिनेमात त्याच्यासोबत करिना कपूर दिसणार आहे.