सुलेमानी ठार; ट्रम्प यांचा आइसक्रीमवर ताव - Times of Maharashtra

Saturday, January 4, 2020

demo-image

सुलेमानी ठार; ट्रम्प यांचा आइसक्रीमवर ताव

https://ift.tt/2QL2qTG
photo-73094774
वॉशिंग्टन: ईराणचे बाहुबली जनरल कासिम सुलेमानी मारले गेल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी आइस्क्रीम खाऊन आनंद साजरा केला. या वेळी ट्रम्प यांच्या सोबत केविन मॅककार्थी आणि त्यांचे अनेक जुने मित्र होते. याबाबत प्रसारित झालेल्या वृत्तांनुसार, सुलेमानी मारल्या गेल्याचे वृत्त समजल्यानंतर ट्रम्प यांनी मार-ए-लोगो क्लबमध्ये आइस्क्रीमचा स्वाद चाखला. डोनाल्ड ट्रम्प यांनी अशाच प्रकारे सन २०१७ मध्ये सीरियात केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर चॉकलेट केक खाऊन आनंद साजरा केल्याचे वृत्त अमेरिकेतील वृत्तवाहिनी सीएनएनने दिले आहे. त्या वेळी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी चिनफिंग हे देखील उपस्थित होते. ट्रम्प यांनीच त्यांना सीरियातील क्षेपणास्त्र हल्ल्याबाबत माहिती दिली आणि त्यांना चॉकलेट केक खायला दिला. या हल्ल्यानंतर ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्रध्वजाचे छायाचित्र ट्विट केले होते. राष्ट्रध्वज ट्विट करत ट्रम्प यांनी जगाला संदेश देण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. ट्रम्प यांनी या ट्विटमध्ये कोणताही मजकूर लिहिलेला नव्हता. या हल्ल्याचा आपणच आदेश दिल्याची माहिती ट्रम्प यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली होती. सुलेमानी यांची हत्या ईराणशी असलेला वाद वाढवण्यासाठी केलेली नसून आम्ही एक युद्ध थांबवण्यासाठी ती केल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. आम्ही युद्ध सुरू करण्यासाठी ही कारवाई केली नसल्याचेही त्यांनी पुढे स्पष्ट केले.

'सुलेमानी रचत होते हल्ल्याचा कट' ईराणमध्ये सत्ता परिवर्तन व्हावे असे आपल्याला वाटत नाही, मात्र ईराणी सरकार छद्म सेनानींचा वापर करून शेजारी देशांना अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे आणि हे आता बंद व्हायला हवे, असे ट्रम्प म्हणाले. सुलेमानी हे अमेरिकी राजकीय व्यक्ती आणि लष्करी अधिकाऱ्यांवर हल्ला करण्याटा कट रचत होते. याच कारणामुळे त्यांना लक्ष्य करण्यात आल्याचे ट्रम्प म्हणाले. ईराणने जर आमच्या या कारवाईला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला, तर ते थोपवण्याची आमची तयारी असल्याचेही ट्रम्प म्हणाले.

Pages