१५० रेल्वेचे तिकिट दर खासगी कंपन्या ठरवणार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, January 4, 2020

१५० रेल्वेचे तिकिट दर खासगी कंपन्या ठरवणार

https://ift.tt/2Qqv3Xn
नवी दिल्लीः देशातील रेल्वेचे करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पडलं आहे. भारतीय रेल्वेने १०० रेल्वे मार्गांची पाहणी केली असून या मार्गावर लवकरच १५० खासगी रेल्वे धावणार आहेत. इतकच नव्हे तर या रेल्वेत किती तिकिट आकारायचे याचा अधिकार खासगी कंपन्यांना असणार आहे. खासगी कंपन्यांना बाजार भावानुसार प्रवाशांकडून तिकिट वसूल करण्याची मुभा मिळणार आहे. व नीती आयोगाच्या खासगी ऑपरेटर्सकडून १०० रेल्वे मार्गावर १५० खासगी रेल्वे धावण्याला परवानगी मिळाल्यानंतर रोडमॅप तयार करण्यात आला आहे. यासंदर्भात एक डिस्कशन पेपरही आणण्यात आला आहे. खासगी रेल्वेतून २२ हजार ४०० कोटी रुपयांची गुंतवणूक येऊ शकते, असा अंदाज वर्तवला आहे. अर्थ मंत्रालयाने १९ डिसेंबर रोजी पब्लिक प्रायव्हेट अप्रेजल कमिटी (PPPAC) कडून दाखल करण्यात आलेल्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. देशभरात १०० रेल्वे मार्गावर १५० खासगी रेल्वे धावणार असून यासाठी लांब पल्ल्याच्या गाड्यांची निवड केली आहे, अशी माहिती रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली आहे. मुंबई-कोलकाता, मुंबई-चेन्नई, नवी दिल्ली-मुंबई, तिरुवनंतपूरम-गुवाहाटी, नवी दिल्ली-कोलकाता, नवी दिल्ली-बेंगळुरू, नवी दिल्ली-चेन्नई, कोलकाता-चेन्नई. चेन्नई-जोधपूर या मार्गांचा समावेश आहे. तसेच, या प्रमुख मार्गांपैकी मुंबई-वाराणसी, मुंबई-लखनऊ, मुंबई-नागपूर, नागपूर-पुणे, सिंकदराबाद-विशाखापट्टणम, पाटणा-बेंगळुरू, पुणे-पाटणा, चेन्नई-कोईबंतूर, चेन्नई-सिंकदराबाद, सूरत-वाराणसी, भुवनेश्वर-कोलकाताचा समावेश आहे. नवी दिल्ली हून पाटणा, अलाहाबाद, अमृतसर, चंदीगड, कटरा, गोरखपूर, छपरा व भागलपूरचा समावेश आहे. १०० मार्गापैकी नवी दिल्लीहून ३५, मुंबईतून २६, कोलकाताहून १२, चेन्नईहून ११ आणि बेंगळूरूहून ८ मार्ग कनेक्ट होणार आहेत. हे सर्व शहर महानगर आहेत. अन्य काही महानगर नसलेल्या शहरातही हे रेल्वेमार्ग जोडण्याचा विचार सुरू आहे. यात गोरखपूर-लखनऊ, कोटा-जयपूर, चंदीगड-लखनऊ, विशाखापट्टणम-तिरुपती आणि नागपूर-पुणे या शहराचा समावेश आहे. खासगी रेल्वेच्या मार्गासाठी पाहणी करणे सुरू आहे. खासगी कंपन्यांना बोली लावण्यासाठीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. भारतीय रेल्वेसाठी हा मैलाचा दगड असणार आहे, असे रेल्वे बोर्डाचे चेअरमन विनोद कुमार यादव यांनी सांगितले आहे.