'भारतीय संविधानाचा मसुदा ब्राह्मणाने बनवला' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, January 4, 2020

'भारतीय संविधानाचा मसुदा ब्राह्मणाने बनवला'

https://ift.tt/36pjuoC
अहमदाबादः भारतीय एका ब्राह्मणाने बनवला आहे. याचे श्रेय खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीच दिले होते, असा दावा गुजरात विधानसभा अध्यक्ष यांनी केला आहे. संविधानाचा मसुदा बी. एन. राव यांनी बनवला होता, व याचे श्रेय स्वतः आंबेडकरांनी दिले होते, असे त्रिवेदी म्हणाले. देशात ज्या नऊ लोकांना नोबेल पुरस्कार मिळाला आहे त्यात ८ जण ब्राह्मण होते, असेही त्रिवेदी यावेळी म्हणाले. 'मेगा ब्राह्मण बिजनेस समिट' निमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले आहे. ६० देशाच्या संविधानाचा अभ्यास केल्यानंतर आपल्या देशाचे संविधान बनवण्यात आले आहे. त्यामुळे आपण मोठ्या अभिमानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेतो. परंतु, आंबेडकर यांनी स्वतः म्हटले होते की, बी. एन. राव (ब्राह्मण) यांनी संविधानाचा मसुदा बनवला आहे, असे ते म्हणाले. या कार्यक्रमाला गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानीही उपस्थित होते. अनेकांना माहिती नाही की, ६० देशाच्या संविधानाचा अभ्यास केल्यानंतर भारतीय संविधान तयार करण्यात आले. त्यानंतर भारतीय संविधानाचा मसुदा तयार करण्यात आला. डॉ. आंबेडकरांना मसुदा कोणी दिला आहे, हे तुम्हाला माहिती आहे का?, ज्या-ज्यावेळी संविधानाचा विषय आला त्या-त्यावेळी आपण सर्वच मोठ्या आदराने डॉ. आंबेडकरांचे नाव घेतो. परंतु, भारतीय संविधानाचा मसुदा लिहिण्याचे काम एका ब्राह्मणाने केले. ब्राह्मण नेहमीच दुसऱ्या व्यक्तींना पुढे करीत असतो. बीएन रावने आंबेडकरांना आपल्या पुढे केले. आम्हाला आंबेडकरांवर अभिमान आहे. कारण त्यांनी २५ डिसेंबर १९४९ ला संविधान सभेतील आपल्या भाषणात याची कबुली दिली आहे, असेही त्यांनी यावेळी म्हटले.