दीपिकाचे बाबा म्हणाले, '३५ वर्ष थांबा मग कळेल' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, January 5, 2020

दीपिकाचे बाबा म्हणाले, '३५ वर्ष थांबा मग कळेल'

https://ift.tt/35pbind
मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणचा आज ३४ वा वाढदिवस. २०१८ मध्ये तिने अभिनेता रणवीर सिंगला ६ वर्ष जेट केल्यानंतर राजेशाही थाटात लग्न केलं. त्या दिवसापासून ही जोडी बॉलिवूड नेहमीच चर्चेत असते. त्यांच्या संसाराबद्दल जाणून घेण्याची साऱ्यांनाच इच्छा असते. सध्या दीपिका तिच्या छपाक सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. आजचा दिवसही ती सिनेमाचं प्रमोशन करण्यातच व्यग्र असणार आहे. प्रमोशनमध्ये दीपिकाला सिनेमासोबतच काही खासगी प्रश्नही विचारण्यात आले. एका मुलाखतीत दीपिकाने तिच्या आई- बाबांनी तिला लग्नाचा काय सल्ला दिला याचा किस्सा सांगितला. दीपिकाला तिच्या वैवाहिक जीवनाबद्दल प्रश्न विचारला असता ती म्हणाली की, 'सध्या तरी मी हा सगळा प्रवास एन्जॉय करतेय. पण जेव्हा मी माझ्या आई- बाबांशी किंवा रणवीरच्या आई- बाबांशी बोलते ते फक्त एवढंच सांगतात की, ३५ वर्ष थांब.. सगळं काही कळेल.' यानंतर दीपिका म्हणाली की, 'कदाचित लग्नाच्या ३५ वर्षांनंतर मला कळेल की लग्न काय असतं. सध्या तरी माझ्या डोक्यात असे विचार येत नाहीत आणि मी सगळ्या गोष्टी एन्जॉय करत आहे.' यावेळी दीपिकाला तिच्यात आणि रणवीरमध्ये भांडण होतं का असा प्रश्न विचारण्यात आला. याचं उत्तर देताना दीपिका म्हणाली की, 'आमच्यात भांडणं होतं नाहीत. कारण आम्ही कमी वेळेसाठी भेटतो. त्यामुळे जेवढा वेळ एकत्र असतो तो एकमेकांसोबत जगतो.' एकमेकांचा मान ठेवतो- दीपिका पदुकोण पुढे म्हणाली की, 'आम्ही जसेही आहोत त्यात एकमेकांचा सन्मान करतो. त्याच्या आणि माझ्या विचारांमध्ये खूप तफावत आहे पण तरीही तो मला उत्तमरित्या समजून घेतो आणि मी त्याला. मला पहाटे उठायला आवडतं. तसंच व्यक्तशीरपणा आवडतो. आयुष्य शिस्तबद्ध पद्धतीने जगलेलं मला आवडतं. रणवीर बरोबर याच्या विरुद्ध आहे. पण तरीही आमच्यातलं बॉण्डिंग अफलातून आहे.' काही दिवसांपूर्वी छपाक चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. प्रेक्षकांनी ट्रेलरला चांगला प्रतिसाद दिला असून अनेकांनी दीपिकाच्या अभिनयाचं कौतुकही केलं. येत्या १० जानेवारीला हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. विशेष म्हणजे याच दिवशी अजय देवगण आणि सैफ अली खानचा तानाजी- द अनसंग वॉरिअर सिनेमाही प्रदर्शित होत आहे. आता प्रेक्षक कोणत्या सिनेमाला पसंती देतात हे पाहणं औत्सुक्याचं असेल