रियलमीच्या या स्मार्टफोन्सवर ३ हजार डिस्काउंट - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, January 3, 2020

रियलमीच्या या स्मार्टफोन्सवर ३ हजार डिस्काउंट

https://ift.tt/2tlHXNh
नवी दिल्लीः चीनची स्मार्टफोन कंपनी ने रियलमी २०२० () या सेलची घोषणा केली आहे. हा सेल आजपासून सुरू होत आहे. ५ जानेवारी पर्यंत सुरू राहणाऱ्या या सेलमध्ये रियलमीच्या फोन्सवर मोठा डिस्काउंट दिला जात आहे. तसेच नो कॉस्ट ईएमआयचा पर्याय दिला जात आहे. रियलमी ३ प्रो या स्मार्टफोनवर कंपनी ३ हजार रुपयांचा डिस्काउंट देत आहे. ४ जीबी रॅम असलेला हा फोन ग्राहकांना केवळ ९९९९ रुपयांत खरेदी करता येऊ शकणार आहे. ६ जीबीचा ११ हजार ९९९ रुपयांत तर १२८ जीबी स्टोरेजचा फोन १२ हजार ९९९ रुपयात खरेदी करता येऊ शकतो. रियलमी एक्सवर या सेलमध्ये २ हजारांचा डिस्काउंट दिला जात आहे. ४ जीबी रॅमचा फोन १४ हजार ९९९ रुपयात तर ८ जीबी रॅमचा फोन १७ हजार ९९९ रुपयात खरेदी करता येणार आहे. रियलमी ३आय या फोनवर २ हजारांचा डिस्काउंट दिला जात आहे. हा फोन फक्त ६ हजार ९९९ रुपयात तर तर ४ जीबी रॅमचा फोन ७ हजार ९९९ रुपयात खरेदी करता येऊ शकतो. रियलमी ५ प्रो या फोनवर १ हजारांचा डिस्काउंट दिला जात आहे. फोनच्या तीनही प्रकारात १ हजार रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. त्यामुळे हे फोन १२,९९९ रुपये, १३,९९९ रुपये आणि १५,९९९ रुपयांत खरेदी करता येणार आहे. रियलमी सी२ या फोनवर ५०० रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. हा फोन ५ हजार ९९९ रुपयात खरेदी करता येणार आहे. तर ३ जीबी रॅमचा फोन ६ हजार ९९९ रुपयात खरेदी करण्याची ग्राहकांना संधी आहे.