मुंबई: संपूर्ण जगात मोठ्या उत्साहात केले जात आहे. न्यूझीलंडमधील ऑकलँड येथे सर्वप्रथम नव्या वर्षाचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे स्वागत सुरू झाले. पाहुयात, देशात आणि जगभरात नव्या वर्षाचे स्वागत कसे केले जात आहे... लाइव्ह अपडेट्स... >> वाराणसीत गंगा आरती करत नव्या वर्षाचे स्वागत करण्यात आले. >> पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना 'अशा' दिल्या नव्या वर्षाच्या शुभेच्छा! >> मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे नव्या वर्षाच्या स्वागताचा एक क्षण... >> नव्या वर्षाच्या स्वागतासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रोशणाईने झळाळून निघाले. >> मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे मुंबईकरांनी नवे वर्ष २०२० चे उत्साहात स्वागत केले. >> चीनमध्ये एका भव्य कार्यक्रमात नव्या वर्षाचे स्वागत करण्यात आले. >> महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनच्या सर्व वाचकांचे नवीन वर्षाचे मन:पूर्वक स्वागत