पंकजा परदेशात; ZP ची जबाबदारी प्रितम मुंडेंवर - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, January 4, 2020

demo-image

पंकजा परदेशात; ZP ची जबाबदारी प्रितम मुंडेंवर

https://ift.tt/2STbN6i
photo-73095099
बीड : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून भाजपच्या ताब्यातील जिल्हा परिषदांमध्येही ही आघाडी झाली. यामुळे भाजपला काही जिल्हा परिषदा गमवाव्या लागल्या. आता बीड जिल्हा परिषदेतही असंच चित्र पाहायला मिळण्याची शक्यता आहे. भाजप नेत्या यांनी अडीच वर्षांपूर्वी राष्ट्रवादीला धक्का देत भाजपचा झेंडा झेडपीवर फडकवला होता. पण यावेळी आता पंकजा मुंडे परदेशात आहेत. त्यांच्या उपस्थितीत खासदार डॉ. प्रितम मुंडे यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार आणि कॅबिनेट मंत्री यांनीही सत्तेसाठी समीकरणांची जुळवाजुळव केली आहे. अध्यक्षपदासाठी आज फक्त मतदान पार पडणार आहे. पण हायकोर्टाच्या आदेशामुळे निकाल १३ जानेवारीपर्यंत राखून ठेवला जाणार आहे. धनंजय मुंडे यांनी झेडपी अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी औरंगाबादमध्ये आढावा बैठक घेतली. बीडमध्येही महाविकास आघाडी होणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. पंकजा मुंडेंच्या नाराजीचा भाजपला फटका ? अडीच वर्षांपूर्वी निवडणूक झाली तेव्हा जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. पण पंकजा मुंडे यांनी सत्ताचक्र फिरवली आणि भाजपची सत्ता स्थापन केली. पण पंकजा मुंडे पक्षावर नाराज असल्याचं बोललं जातं. या ऐन निवडणुकीच्या वेळी त्या परदेशात आहेत. त्यामुळे याचा परिणाम स्थानिक समीकरणांवरही जाणवणार आहे. दुसरीकडे धनंजय मुंडे मंत्री झाल्यानंतर त्यांच्यासमोर ही आता प्रतिष्ठेची लढाई आहे. यांच्याकडे जिल्ह्यातील जबाबदारी असल्याने त्या समीकरणांची जुळवाजुळव करत आहेत. मात्र पंकजा मुंडे यांच्या अनुपस्थितीत नेमकं काय होणार याकडे लक्ष लागलं आहे. बीड जिल्हा परिषदेत कुणाच्या किती जागा ? राष्ट्रवादी – १९ भाजप – १९ शिवसेना – ०४ काँग्रेस – ०३ काकू-नाना आघाडी – ०२ अपक्ष – ०२ शिवसंग्राम – ०४ (सर्व सदस्य भाजपात) राष्ट्रवादीचे उमेदवार ठरले राष्ट्रवादीने अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी नावेही निश्चित केली आहेत. जिल्हा परिषद सदस्या शिवकन्या शिरसाठ यांचे नाव अध्यक्षपदासाठी, तर नागरगावचे जिल्हा परिषद सदस्य जयसिंह सोळंके यांचे नाव उपाध्यक्षपदासाठी निश्चित करण्यात आलं आहे. जयसिंह सोळंके हे आमदार प्रकाश सोळंके यांचे पुतणे आहेत. अडीच वर्षांपूर्वी काय झालं होतं?सुरेश धस गटाचे राष्ट्रवादीचे ७ सदस्य भाजपला येऊन मिळाले. त्यामुळे राष्ट्रवादीला सत्तेपासून वंचित रहावं लागलं. यानतंर सुरेश धस यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. अडीच वर्षांपूर्वी भाजप, शिवसेना, शिवसंग्राम यांनी जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केली. पण यावेळीही राष्ट्रवादीचा मार्ग सोपा नसेल. कारण, मुंदडा कुटुंब आता भाजपात आहे.

Pages