हैदराबाद युनिव्हर्सिटीत रंगली 'शाहीन बाग नाईट' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, February 22, 2020

हैदराबाद युनिव्हर्सिटीत रंगली 'शाहीन बाग नाईट'

https://ift.tt/3bXwkxM
हैदराबाद : नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात () आंदोलन करण्यासाठी हैदराबाद युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांना दंड ठोठावण्यात आलाय. युनिव्हर्सिटीच्या नियमांचा भंग केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. या विद्यार्थ्यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधोत युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये रात्री ९.०० वाजल्यानंतर 'शाहीन बाग नाईट'चं आयोजन केलं होतं. यामुळे हैदराबाद युनिव्हर्सिटीनं तीन विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंड ठोठावलाय. विद्यार्थी संघटनेनं मात्र या कारवाईचा निषेध केलाय. विद्यार्थ्यांना तंबी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ फेब्रुवारी रोजी युनिव्हर्सिटीच्या आदेशानुसार या विद्यार्थ्यांना शिक्षा सुनावण्यात आली. 'नॉर्थ शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये ३१ जानेवारी रोजी रात्री ९.०० वाजल्यानंतर विद्यार्थ्यांनी एक कार्यक्रम आयोजित केला होता' असा उल्लेख या आदेशात करण्यात आलाय. यावेळी, कॅम्पसच्या भिंती खराब केल्या गेल्याचंही यात म्हटलं गेलंय. यानंतर विद्यार्थ्यांना चेतावणी देत भविष्यात आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रीय करण्याच्या सूचना देण्यात आल्या. 'अशा पद्धातीच्या आयोजनांमध्ये आणि अनुशासनतेत सहभाग विद्यार्थ्यांच्या अकॅडमिक करिअरवर हानिकारक प्रभाव पाडू शकतो' असंही यात म्हटलं गेलंय. विद्यार्थी संघटनेचा निषेध विद्यार्थी संघटनेनं मात्र याचा जोरदार निषेध करत युनिव्हर्सिटीनं कोणत्याही अटींशिवाय सुनावलेली शिक्षा मागे घ्यावी, अशी मागणी केलीय. 'हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटी स्टुडंटस् युनियन विद्यार्थ्यांना आश्वासन देत आहे की, कोणत्याही किंमतीवर प्रशासनासमोर झुकणार नाही. आणि विद्यार्थ्यांच्या हितांचं रक्षण करण्यासाठी प्रयत्न करेल' असं विद्यार्थी संघटनेनं म्हटलंय. नियमांचं उल्लंघन युनिव्हर्सिटीच्या प्रवक्त्यांच्या म्हणण्यानुसार, नियमाप्रमाणे कॅम्पसमध्ये रात्री ९.०० वाजल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या बैठका किंवा आंदोलन करण्याची परवानगी नाही. या विद्यार्थ्यांनी या नियमांचं पालन न करता आपला कार्यक्रम रात्री ९.०० वाजल्यानंतर सुरू केला जो रात्री २.३० वाजेपर्यंत सुरू होता. त्यामुळे या कार्यक्रमाच्या आयोजक विद्यार्थ्यांवर करण्यात आली. परंतु, हा दंड भरण्यासाठी विद्यार्थ्यांना वेळेची कोणतीही सीमा देण्यात आलेली नाही.