
आचार्य कृष्ण दत्त शर्माभारतीय क्रिकेटपटू यांचा आज जन्मदिन आहे. वसीम जाफर यांच्यासह आज जन्मदिवस असणाऱ्यांना वाढदिवस आणि उज्ज्वल भविष्यासाठी अनेकानेक शुभेच्छा... आज वाढदिवस असणाऱ्यांना यंदाचे वर्ष कसे जाईल, यावर टाकलेला दृष्टिक्षेप... आगामी वर्षात शुक्र ग्रहाचा फलदायक प्रभाव आपल्यावर राहील. फेब्रुवारी महिन्यात अचानक धनलाभ होईल. मार्च महिन्यात अडकून राहिलेली कामे मार्गी लागतील. एप्रिल महिन्यात मित्रांचे सहकार्य लाभेल. नवीन शोध, सृजनात्मक कामे होतील. समाजातील मान-सन्मान वाढेल. मे महिन्यात एखाद्या स्पर्धेत घवघवीत यश प्राप्त होईल. जून महिन्यात इच्छा नसतानाही प्रवास करावे लागतील. आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा. जुलै-ऑगस्ट या कालावधीत आपल्या कार्याचे कौतुक केले जाईल. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात राहणीमान उंचावेल. शत्रूंवर विजय मिळवता येईल. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात एखादा जुना आजार पूर्णपणे बरा होईल. जानेवारी २०२१ मध्ये आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल. पुढील वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात तीर्थाटन होईल. अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळण्यासाठी सूर्याची उपासना फायदेशीर ठरेल.